Breking News
तालुका स्तरावर अन्न व औषध प्रशासनाचे संपर्क कक्ष सुरू करण्याची ओमप्रकाश यांची मागणी..मोशी कचरा डेपो दुर्घटना : पर्यावरण विभाग व अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देशकाळू व शाई धरणवासियांच उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना साकडंपालखी सोहळ्यात भाविकांकडील दागिने लंपासलोकमान्यनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेमोशी कचरा डेपो दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकाचा मृत्यूऑपरेशन टायगर हे उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलितवारकऱ्यांचा ‘चरण सेवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादआषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर “महिला उन्नती वारी २०२६” उपक्रमाचा ऊरळी कांचन येथे शुभारंभश्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी माळेगाव बु. सज्ज

पुण्यात सदाशिव पेठेत फ्लेक्स प्रिटींग दुकानात आग

पुण्यात सदाशिव पेठेत फ्लेक्स प्रिटींग दुकानात आग

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आणली आटोक्यात

marathinews24.com

पुणे – फ्लेक्स प्रिटींग करणाऱ्या दुकानात आग लागल्याची घटना सदाशिव पेठेतील कुमठेकर रस्त्यावर मध्यरात्री घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीत फ्लेक्स प्रिटींग यंत्र, कच्चा मालासह अन्य साहित्याचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी १५ ते २० मिनिटांत आग आटोक्यात आणली. कुमठेकर रस्त्यावर लकी काॅपिअर्स हे फ्लेक्स प्रिटिंग दुकान आहे. रविवारी (१२ जुलै) मध्यरात्री एकच्या सुमारास दुकानातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाला दिली.

धनकवडीतील उड्डाणपुलाजवळ एकाचा खून – सविस्तर बातमी 

अग्निशमन दलाच्या कसबा पेठ, एरंडवणे अग्निशमन केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाले. पाच मजली इमारतीत पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर लकी काॅपिअर्स हे दुकान आहे. तेथे फ्लेक्स प्रिटिंग करुन दिले जातात. अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी कमलेश चौधरी, तांडेल हरीश बुंदेले, मुश्ताक शेख, राजेंद्र महाडिक, दत्तात्रय सहाणे, सनी लोखंडे यांच्यासह जवानांनी पाण्यााचा मारा करुन आग आटोक्यात आणली. पंधरा ते वीस मिनिटांत आग आटोक्यात आल्यानंतर जवानांनी दुकानातील अंतर्गत भागाची पाहणी केली. आगीची झळ प्रिटिंग यंत्रणा, तसेच कच्च्या मालाला पोहोचली होती.

दुकानात कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली. या इमारतीतील रहिवाशी आग लागल्यानंतर घाबरले होते. मध्यरात्री अडीचपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तेथून रवाना झाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×