Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

रोखपालाला मारहाण करुन ८ लाखाची रोकड लुटली

बिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार

सिंहगड रस्ता भागातील घटना

marathinews24.com

पुणे – मद्य विक्री दुकानात काम करणाऱ्या रोखपालाला मारहाण करुन चोरट्यांनी आठ लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत हौसकुमार प्रकाश इंगळे (वय ४२) यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आग – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगळे हे नऱ्हे भागातील एका मद्य विक्री दुकानात रोखपाल आहे. रविवारी (२६ जुलै) रात्री अकराच्या सुमारास दुकानात जमा झालेली रोकड घेऊन ते दुचाकीवरुन सिंहगड रस्ता भागातील प्रयेजा सिटी रस्त्याने निघाले होते. त्या वेळी वारजेकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर दुचाकीवरुन आलेल्या चौघा चोरट्यांनी त्यांना अडवले. चेहऱ्यावर स्प्रे मारुन चोरट्यांनी आठ लाख सहा हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून नेली. इंगळे यांना चोरट्यांनी मारहाण केली, त्यानंतर चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. घाबरलेल्या इंगळे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार, सहायक आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा शेोध घेण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×