Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्जतर्फे पत्रकारांना रेनकोटचे वितरण

फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्जतर्फे पत्रकारांना रेनकोटचे वितरण

पावसाळ्यातील वार्तांकनासाठी पत्रकारांना उपयुक्त मदतीचा हात

marathinews24.com

पुणे – सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्जतर्फे पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांना पावसाळ्यात उपयुक्त ठरणाऱ्या दर्जेदार रेनकोटचे वितरण करण्यात आले. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, सरचिटणीस हिरा सरवदे, फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्जचे पदाधिकारी अनिरुद्ध सरनाईक, प्रवीणकुमार सिंह, तुषार गुप्ता व मुकुल माधव फाउंडेशनचे समन्वयक सचिन कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेऊन नवउद्योजकांनी स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

पत्रकारांना कोणत्याही परिस्थितीत घटनास्थळी जाऊन वार्तांकन करावे लागते. विशेषतः पावसाळ्यात प्रतिकूल हवामानाचा सामना करत आपली जबाबदारी पार पाडावी लागते. अशावेळी फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्जने दिलेले रेनकोट पत्रकारांच्या दैनंदिन कामात उपयुक्त ठरणार असल्याची भावना उमेश शेळके यांनी व्यक्त केली. उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून संस्था विविध उपक्रम राबवत असून, पत्रकारांसाठी केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार समाजाच्या चांगल्यासाठी अहोरात्र झटत असतो. ऊन, वारा, पाऊस याची तमा न करता प्रतिकूल परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावत असतो. पावसाळ्यात त्यांना संरक्षणासाठी रेनकोट उपयोगी पडतील, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. पत्रकार कल्याणासाठी फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्ज यापुढेही सहकार्य करीत राहील, अशी भावना सरनाईक व कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×