Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत खो खो असोसिएशन बैठक संपन्न

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत खो खो असोसिएशन बैठक संपन्न

खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस; २३ जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप; खेळाडूंच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव पाठीशी राहणार; बारामतीत ऑक्टोबरमध्ये कै. भाई नेरुरकर चषक स्पर्धा

marathinews24.com

पुणे – बदलत्या युगात नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कामकाज पेपरलेस करण्याच्या उद्देशाने असोसिएशनच्या जिल्हा संघटकांसह तांत्रिक समितीला लॅपटॉपचे वितरण उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्ष सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. खेळ आणि खेळाडूंच्या सन्मानासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव पाठीशी राहू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री पवार यांनी यावेळी दिली.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव – सविस्तर बातमी 

या कार्यक्रमाला असोसिएशनच्या उपाध्यक्ष अश्विनी पाटील, सरचिटणीस डॉ. चंद्रकांत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार गोविंद शर्मा, शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार प्राप्त जनार्दन शेळके, अर्जून पुरस्कार प्राप्त सुरेखा कुलकर्णी, श्रीरंग इनामदार उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, बदलत्या युगामध्ये नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे ही काळाची गरज बनली असून लॅपटॉप मुळे पेपरलेस कामकाजाला सुरुवात होईल. स्व. अजित दादांनी खो खो खेळाच्या चौफेर प्रगतीसाठी अत्यंत तळमळीने प्रयत्न केले. त्यांच्याच संकल्पनेतून पेपरलेस कामकाजासाठी लॅपटॉप वितरण होत असल्याचे सांगितले.

कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची व प्रतिष्ठित खो-खो स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली जाते. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ही स्पर्धा बारामती येथे होणार असून स्पर्धेच्या अनुषंगाने असोसिएशनने तयारीला सुरुवात करावी,असेही त्या म्हणाल्या.

यावेळी असोसिएशन अंतर्गत अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव,धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड,नंदुरबार, पालघर, परभणी, पुणे, रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे येथील सचिवांकडे लॅपटॉप सुपूर्द करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×