अल्पवयीन ताब्यात
marathinews24.com
पुणे – मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या चौघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने नाना पेठ परिसरात पकडले. या प्रकरणात ताब्यात घेतलेला एक जण अल्पवयीन असून, त्यांच्याकडून मेफेड्रोन, दुचाकी, मोबाइल संच असा ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नासीर रसूल शेख (वय २२) फराज नजीर शेख (वय २४, रा. सय्यदनगर, हडपसर), जावेद हसन शेख (वय २४, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आरोपींबरोबर असलेल्या अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.
प्रेमप्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या – सविस्तर बातमी
नाना पेठेतील एडी कॅम्प चौकात सात जण मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी अमोल सरडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून चौघांना पकडले. त्यांच्याकडून ७१ ग्रॅम मेफेड्रोन, तीन दुचाकी, मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त हसन गौहर, सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनिरीक्षक योगेश कोतकर, सहायक फौजदार विठ्ठल साळुंके, आशा भिंगारे, अमोल सरडे, अक्षय शिर्के, मद्देेल, साळुंखे, राजे, गुंड यांनी ही कारवाई केली.
शिवाजीनगर भागातील संचेती चौकात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून २७ हजार रुपयांचे ९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. आसिफ अब्दुल शेख (वय २६, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दुचाकीस्वार शेख हा मेफेड्रोन विक्रीसाठी संचेती चौकात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी तुषार साळुंखे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून मेफेड्रोन, दुचाकी, मोबाइल संच असा एक लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.























