Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण खपवून घेणार नाही – पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा

गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण खपवून घेणार नाही - पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा

गर्दीचे नियोजन, सुरक्षिततेवर विशेष लक्ष

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांची गय केली जाणार नाही. डीजे, लेसर लाईट, ध्वनिक्षेपकाच्या कर्णकर्कश आवाजासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. उत्सव काळातील सुरक्षा, गर्दीचे नियोजन, अलिकडेच उघडकीस आलेल्या पोलीस भरती प्रकरणाबाबत सविस्तर त्यांनी माहिती दिली.

अल्पवयीन गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणणार-पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी 

गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत ध्वनिप्रदूषणासंदर्भात बैठका घेऊन नियमांबाबत एकमत झाले असून, बहुतांश मंडळांनी नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी पुणे पोलीस दल सज्ज झाले आहे. उत्सव काळात शहरात देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतात. विशेषतः विसर्जन मिरवणुकीच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेसोबतच गर्दी व्यवस्थापनावर पोलिसांचा विशेष भर राहणार आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये आणि उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा पाळण्याबाबत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सहमती झाली आहे. चारपेक्षा अधिक बेस स्पीकर वापरण्यावर मर्यादा घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येताच संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

पुण्यात दहीहंडीत नियमभंग; ११६ खटले

दहीहंडी उत्सवादरम्यान ध्वनीची निर्धारित पातळी ओलांडणार्‍या मंडळांवर पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, आतापर्यंत ११६ खटले तर भारतीय न्याय संहितेच्‍या कलमानुसार १० गुन्‍हे, प्रेशर मीड, प्लाझ्मा, साउंड जप्‍तीची कारवाई अशा कारवाया करण्यात आल्‍या आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाचे नियम मोडणार्‍यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. ध्वनीची मर्यादा, ध्वनिक्षेपकांची संख्या तसेच अन्य नियम व अटींचे पालन न करणार्‍या गणेश मंडळांवर तातडीने आणि कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

हॉटेल, लॉज चालकांना तंबी

शहरातील हॉटेल, लॉज आणि ‘होम-स्टे’ चालकांनी त्यांच्या आस्थापनात वास्तव्यास येणाऱ्या प्रत्येक विदेशी देशातील महत्‍वाच्‍या पाहुण्याची संपूर्ण माहिती स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक आहे. ही माहिती न देणाऱ्या अथवा नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×