वानवडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – सोसायटीच्या आवारात एकाकडील २ लाख ६० हजारांची रोकड ठेवलेली पिशवी हिसकावून नेल्याची घटना वानवडी भागात घडली. याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने वानवडी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खराडी परिसरात खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला लुटले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५४ वर्षीय तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. ते वानवडीतील नॅन्सी टाॅवर सोसायटीत राहायला आहेत. मंगळवारी (८ सप्टेंबर) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ते सोसायटीच्या परिसरातून निघाले होते. त्यांच्याकडील पिशवीत दोन लाख ६० हजारांची रोकड होती. सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्याकडील रोकड असलेली पिशवी हिसकावून नेली. तक्रारदाराने आरडाओरडा केला. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक मोकाटे तपास करत आहेत.




















