Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांची जय्यत तयारी; पोलीस आयुक्तांकडून पाहणी

गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांची जय्यत तयारी; पोलीस आयुक्तांकडून पाहणी

चार बेस, चार टॉपची ध्वनिमर्यादा कायम, अतिक्रमण करणाऱ्यांना कडक इशारा

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना पोलिसांसह महापालिका प्रशासनाने तयारीचा वेग वाढवला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी, मिरवणुका, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागांत प्रत्यक्ष पाहणी केली. रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचा आढावा घेतला. यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, शांततेत आणि चांगल्या वातावरणात पार पडेल, असा विश्वास पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला.

अतिरेकी धमक्यांना न जुमानता काश्मीरमध्ये साजरा होणार गणेशोत्सव – सविस्तर बातमी 

गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणी पुढील दोन ते तीन दिवसांत मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पुण्यातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गर्दीच्या काळात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी रस्त्यांवरील अतिक्रमणे, सुरू असलेली दुरुस्तीची कामे तसेच इतर समस्या तातडीने दूर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, कसबा पेठ परिसरात पाहणी करताना रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास येताच पोलीस आयुक्तांनी संबंधित दुकानदाराला कडक शब्दांत सुनावले. ‘पुढच्या वेळी सांगणार नाही,’ असा स्पष्ट इशारा दिला. पुन्हा अतिक्रमण आढळल्यास कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. गणेशोत्सवात मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी, गणेश मंडळांच्या मिरवणुकामुळे रस्त्यांवर अतिक्रमण अथवा इतर अडथळे राहिल्यास वाहतूकीला अडथळा निर्माण होतो. गर्दी व्यवस्थापनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यावेळी फरासखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनाही आयुक्तांनी ‘रस्त्यावर फिरा’, असा सल्ला देत परिसरातील परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.

चार बेस, चार टॉप’वरच गणेशोत्सवाचा जल्लोष…

ध्वनिप्रदूषणाबाबतही पोलिस प्रशासनाने भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वपक्षीय प्रतिनिधी, गणेश मंडळांच्या बैठकीत ठरलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. गणेशोत्सवात केवळ निर्धारित चार बेस आणि चार टॉप’ ध्वनिव्यवस्थेलाच परवानगी आहे. त्यापेक्षा अधिक ध्वनिव्यवस्था लावणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार असून प्रतिबंधित प्लाझ्मा यंत्रणा अथवा प्रेशर हॉर्नचा वापर केल्यासही थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ध्वनिमर्यादेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष पथके आणि तपासणीची यंत्रणा कार्यरत ठेवण्यात येणार आहे.

मध्यवर्ती भागात जड वाहनांना निर्बंध

पुण्याच्या मध्यवर्ती भागात होणारी गर्दी लक्षात घेऊन जड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध राहणार आहेत. मिरवणुका आणि गर्दीच्या काळात वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियोजन करण्यात येत आहे. रस्त्यांची स्थिती, वाहतुकीचे संभाव्य मार्ग, गर्दीची ठिकाणे आणि मिरवणुकांच्या मार्गावरील अडथळे यांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे.

सोशल मीडियावर पोलिसांची नजर

गणेशोत्सवाच्या काळात सोशल मीडियाद्वारे जातीय अथवा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, वक्तव्ये किंवा संदेश प्रसारित करणाऱ्यांवरही पोलिसांची नजर राहणार आहे. एखाद्या व्यक्तीच्या वक्तव्यामुळे जातीय तेढ निर्माण होत असल्याचे किंवा कायद्यानुसार गुन्हा घडत असल्याचे आढळल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव जल्लोषात साजरा करताना कायदा सुव्यवस्था, वाहतूक शिस्त आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकासह गणेश मंडळांना केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×