Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

पुण्यातून स्पर्धा परीक्षा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाचे अपहरण

पुण्यातून स्पर्धा परीक्षा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाचे अपहरण

पोलिसांनी ५३ मिनिटांत केली सुटका, दोघे गजाआड

marathinews24.com

पुणे – मैत्रिणीशी बोलण्याच्या रागातून टोळक्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्याचे मोटारीतून अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.९) मध्यरात्री पेरूगेट पोलीस चौकीजवळ घडली आहे. २८ वर्षीय तरुणाचे अपहरण झाल्याची माहिती स्थानिकांनी डायल ११२ द्वारे पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ तपासाला गती देऊन अवघ्या ५३ मिनिटांत तरुणाची सुटका केली. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रसाद सूर्यवंशी (वय २८) असे सुटका केलेल्या तरुणाचे नाव आहे. सागर रमेश बोराडे (वय ३२, रा. वालचंदनगर) आणि किशोर बाळासाहेब सावंत (वय ३२, रा. दसर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या आरोपींना ताब्यात घेतले आहे.

गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांची जय्यत तयारी; पोलीस आयुक्तांकडून पाहणी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण नारायण पेठेत राहायला असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. गुरुवारी मध्यरात्री साडे बारा वाजता काळया रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून (क्र. MH 12 9696) प्रसाद सूर्यवंशी याचे अपहरण झाल्याचा कॉल पोलिसांना मिळाला. पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून पाठलाग सुरू केला. रात्री १ वाजून २३ मिनिटांनी पोलिसांनी सिंहगड रोडच्या दिशेने जाणाऱ्या गाडीला अडवून आरोपींच्या तावडीतून पीडित तरुणाची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी सागर रमेश बोराडे (वय ३२, रा. वालचंदनगर) आणि किशोर बाळासाहेब सावंत (वय ३२, रा. दसर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून केले अपहरण

पीडित प्रसाद आणि आरोपी सागर बोराडे यांची मैत्रीण असून, ते पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. प्रसाद हा आपल्या मैत्रिणीसोबत बोलत असल्याच्या रागातून आरोपी सागरने त्याच्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने प्रसादला मारहाण केली. त्याच्याच स्कॉर्पिओ गाडीतून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. अपहृताची सुटका केल्यानंतर त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, ताब्यात घेतलेल्या दोघांव्यतिरिक्त उर्वरित दोन फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×