Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

पुण्यातील वसुलीवाल्या पोलिसाची आयुक्तांना गुगली

पुण्यातील वसुलीवाल्या पोलिसाची आयुक्तांना गुगली

जीवाचे वाईट करतो म्हणाला अन काही तासांत झाला हजर

marathinews24.com

पुणे – शहरात गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेचे नियोजन सुरू असताना स्पा सेंटरमधील तत्कालीन वसुली वाल्या पोलीस अमलदाराने थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना जीवाचे बरेवाईट करण्याचा मेसेज केला. मोबाइल बंद करुन त्याने अंडरग्राउंड होण्याचा प्रयत्न केला. यामुळे आता आपल्याला सहानभूती मिळेल, साईट पोस्टिगवरुन चांगल्या ठिकाणी बदली होईल अशी त्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र, पोलीस प्रशासनाने संबंधित अमलदाराचा शोध घेऊन त्याला आयुक्तालयात येण्यास भाग पाडले. अखेर आयुक्तांनी दिलेल्या कानपिचक्यानंतर कर्मचार्‍याची चांगलीच तंतरली होती.

पुण्यात अल्पवयीन आरोपींची धिंड पोलिसांना भोवणार – सविस्तर बातमी 

हा कर्मचारी अडीच वर्षांपुर्वी शहरातील बहुतांश स्पा, मसाज सेंटर व्यावसायिकांकडून वसुलीचे काम करत होता. मात्र, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांनी ६४ वसुलीबाज अमलदारांना वठणीवर आणले होते. तेव्हापासून त्याच्यासह बहुतांश वसुलीवाले अमलदार पोलीस मुख्यालयासह साईट पोस्टिंगवर आहेत. अद्यापपर्यंत त्यांना अपेक्षित गुन्हे शाखा, तपास पथकासह महत्वाच्या ठिकाणी नियुक्ती नाही. दरम्यान, संबंधित अमलदार मुख्यालयातील नियुक्तीला कंटाळला होता. त्यामुळे पोलीस मुख्यालयातील अधिकार्‍याच्या त्रासाला कंटाळून वाईट विचार करण्याचा निर्णय घेत असल्याचा मेसेज त्यान आयुक्तांना करुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्याविरुद्ध वारंवार निनावी तक्रारी अर्ज केले जात असून, एकाठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या ठिकाणावरील वादामुळे त्रास होत असल्याचा उल्लेख त्याने अर्जात केला आहे. मात्र, उलटेच घडल्यामुळे पोलीस दलात चर्चा रंगली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×