Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Cyber Fraud Cases

कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे दाखवले आमिष

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने एकाची ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी बिबवेवाडी परिसरातील भोंदू महिला मोनाली विधाते हिच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक, तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोंदू महिलेने अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत एकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोनाली विधाते, कृष्णा विधाते (दोघे रा. सुखसागरनगर, कात्रज), तसेच मोनालीचा भाऊ मयूर, अशोक बनकर, मंजू कौर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक वादातून तरुणाचा भोसकून खून – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी परिसरातील रहिवासी आहे. ते बांधकाम ठेकेदार आहेत. समाज माध्यमात त्यांनी ‘गुरुवर्य माेनाली आई विधाते’ ही चित्रफीत पाहिली होती. या चित्रफितीत कौटुंबिक अडचणी, पीडा दूर करण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. अशा प्रकारच्या अनेक चित्रफिती विधातेने प्रसारित केल्या होत्या. तक्रारदार हे डिसेंबर २०२५ मध्ये तिच्या संपर्कात आले. कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने मोनाली विधाते हिने हळदी-कुंकू, बाहुली, दोर पाठवून तक्रारदाराला पाठवून दिला. त्यानंतर तिने तक्रारदाराला बिबवेवाडीतील सुखसागरनगर परिसरातील घरी बोलावले.

कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखविले. तक्रारदाराला मृत्यूची भीती दाखविली. पीडा दूर करण्यासाठी उतारा टाकवा लागेल, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात ४५ हजार रुपये घेतले. तक्रारदाराला जिवे मारणे, तसेच मारहाण करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विधाते आणि साथीदारांविरुद्ध फसवणूक, तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. माेनाली विधाते हिने अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×