Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

क्रेडीट कार्डची बतावणी, जेष्ठाला ६ लाखांचा गंडा

Pune Courier Scam

पंजाब नॅशनल बँकेच्या हेड ऑफिसमधून बोलत असल्याची बतावणी करत घातला गंडा

marathinews24.com

पुणे – पंजाब नॅशनल हेड ऑफिस द्वारका येथुन बोलत असल्याची बतावणी करत सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाला क्रेडीट कार्ड देण्यासंदर्भात विचारपूस केली. त्यानंतर बँक खात्याची माहिती घेउन ५ लाख ८७ हजार रुपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यांनतर तक्रारदाराने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. याप्रकरणी मोबाइलधारक, बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जेष्ठ नागरिक असून येरवडा परिसरात राहायला आहेत. १५ ऑगस्टला सायबर चोरट्याने तक्रारदाराला संपर्क करुन पंजाब नॅशनल हेड ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. सेवानिवृत्त लोकांना क्रेडीट कार्ड देण्याची बतावणी करीत तक्रारदाराच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर सायबर चोरट्याने तक्रारदाराच्या बँकखात्यातून ५ लाख ८७ हजार रुपये वर्ग करुन घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संपतराव राउत तपास करीत आहेत.

भरदिवसा महिलेचा मोबाइल हिसकावला

भरदिवसा दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या हातातील ७० हजारांचा मोबाइल हिसकावुन नेला. ही घटना २ सप्टेंबरला दुपारी सव्वा दोनच्या सुमारास रामवाडी मेट्रो स्टेशनजवळ घडली आहे. याप्रकरणी प्रभात रोडवर राहणार्‍या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघा दुचाकीस्वार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला २ सप्टेंबरला दुपारी सव्वा दोनच्या सुमारास रामवाडी मेट्रो स्टेशनजवळ थांबली होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्याजवळ येउन हातातील ७० हजारांचा मोबाइल हिसकावुन नेला. महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटे सुसाट पसार झाले. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार वाहनाचा शोध घेउन आरोपींचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस अमलदार ए. वाय. जोगदंडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×