Breking News
चौफुला-सुपे रस्त्यावर एसटी बसचा अपघातससून रुग्णालयात नोकरीच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९५ लाखांची फसवणूकपाण्याची धोकादायक टाकी पडताना कामगार जखमीभारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती

Pune Eco Friendly Ganpati 2026

गणेश भेळचा अनोखा उपक्रम; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वांसाठीच मोठ्या आनंदाचा उत्सव. मात्र ज्यांच्या नावातच गणेश आहे अशा गणेश भेळने यंदा अतिशय अनोखा गणेशोत्सव साजरा करण्याचे योजले आहे. २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांचा वापर करुन १३ फूट उंच आणि १० फूट रुंद असा आगळावेगळा गणपती साकारला आहे. नामदार गोखले पथ म्हणजेच फर्ग्युसन रस्त्यावरील गणेश भेळच्या दालनाबाहेर ही मूर्ती उभारण्यात आली आहे. गणेश भेळचे संस्थापक रमेश गुडमेवार यांच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी छाया गुडमेवार, संचालक रुपेश गुडमेवार आणि दिनेश गुडमेवार व अनुष्का गुडमेवार उपस्थित होते.

‘दगडूशेठ’चे गणपती बाप्पा मयूर रथातून प्रेम मंदिरात विराजमान – सविस्तर बातमी 

मूर्तीवरील या पुऱ्या १२ दिवस आहेत तशाच राहाव्यात यासाठी काही विशेष काळजी घेण्यात आली आहे. अशाप्रकारे अनोख्या रितीने गणपती साकारण्याचे यंदाचे चौथे वर्ष असून दरवर्षी वेगळी संकल्पाना घेऊन गणेश भेळ ग्राहकांसमोर येत असते. ही मूर्ती तयार करण्यासाठी मागील २ महिन्यांपासून तयारी सुरू असून या सर्व पुऱ्या आपल्या कारखान्यात तयार करण्यात आल्या आहेत. तर कलाकार प्रशांत साळुंखे यांनी ही मूर्ती प्रत्यक्षात साकारली आहे.

याबाबत सांगताना गणेश भेळचे संचालक रुपेश गुडमेवार म्हणाले, नागरीकांच्या प्रतिसादामुळेच आम्हाला असे काही करण्याची प्रेरणा मिळते. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पुऱ्या तयार करण्यासाठी वाया जाणाऱ्या/उरलेल्या पिठाचा पुनर्वापर करण्यात आला आहे. तसेच मूर्तीच्या संरचनेसाठी बांबू आणि कागदासारख्या नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. पुनर्वापर आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक संदेश देण्याचा हा गणेश भेळचा प्रयत्न आहे.

संचालक दिनेश गुडमेवार म्हणाले, ‘गणेश’ हे नाव आमच्यासाठी केवळ आमच्या व्यवसायाचं नाव नाही, ते आमच्या आयुष्याशी जोडलेलं एक नातं आहे. आमच्या हातातली पाणीपुरीची प्रत्येक पुरी आमच्यासाठी फक्त एक पुरी नव्हती. त्या प्रत्येक पुरीत आम्हाला ‘गणेश’ दिसत गेला. १९७८ मध्ये श्री. रमेश गुडमेवार आणि श्रीमती छाया रमेश गुडमेवार यांनी पुण्यात एका साध्या हातगाडीपासून गणेश भेळची सुरुवात केली. अस्सल चव, उत्तम गुणवत्ता आणि ग्राहकांचे समाधान या मूल्यांवर सुरू झालेला हा छोटासा व्यवसाय आज पुण्याच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीतील एक लोकप्रिय आणि विश्वासार्ह ब्रँड म्हणून नावारूपाला आला आहे.

आज गणेश भेळच्या ३५ हून अधिक शाखा असून २२ देशांमध्ये हा माल निर्यात केला जातो. आई वडीलांनी सुरू केलेली ही परंपरा आम्ही पुढे नेत असून, आधुनिक व्यवस्थापन, गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण विचारांच्या माध्यमातून ब्रँडचा विस्तार करत आहेत. पुढील १२ दिवस म्हणजेच अनंतचतुर्दशीपर्यंत हा गणपती गणेशभक्तांना पाहता येणार आहे. शिवमुद्रा ढोलताशा पथकाने यावेळी अतिशय उत्तम असे वादन करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×