Breking News
चौफुला-सुपे रस्त्यावर एसटी बसचा अपघातससून रुग्णालयात नोकरीच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९५ लाखांची फसवणूकपाण्याची धोकादायक टाकी पडताना कामगार जखमीभारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

राष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा

राष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा

पक्षकारांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्चाची होणार बचत

marathinews24.com

पुणे – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अंजू एस. शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा व सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत विविध प्रकारच्या ३७ हजार ६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात आला.

पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेश – सविस्तर बातमी 

या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित तसेच प्रिलिटिगेशन स्वरूपातील दिवाणी व फौजदारी प्रकरणे, धनादेश अनादर, मोटार अपघात नुकसानभरपाई, कौटुंबिक वाद, बँक वसुली, भूमिसंपादन, वीजबिल आदी विविध स्वरूपाची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.

लोकअदालतीसाठी एकूण २ लाख ५९ हजार ३५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३७ हजार ६८७ प्रकरणांचा परस्पर सामंजस्याने निपटारा करण्यात आला. न्यायालयात प्रलंबित असलेल्या ८४ हजार ९२० प्रकरणांपैकी ७ हजार ७४४ प्रकरणे, तर प्रिलिटिगेशन स्वरूपातील १ लाख ७४ हजार ११५ प्रकरणांपैकी २९ हजार ९४३ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली.

लोकअदालतीच्या माध्यमातून संवाद आणि परस्पर तडजोडीच्या मार्गाने वाद मिटल्यामुळे पक्षकारांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्चाची बचत झाली. तसेच कौटुंबिक, मालमत्ता आणि अन्य स्वरूपाच्या वादांमध्ये सलोखा राखण्यास मदत झाली.

या लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी न्यायिक अधिकारी, वकील, बँका, विमा कंपन्या, विविध शासकीय विभाग तसेच पक्षकारांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×