Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

Pune Crime : अटक करण्याच्या धमकीने जेष्ठाला लुटले

पोलिसांची केली बतावणी, जेष्ठाला ४८ लाखांचा ऑनलाईन गंडा

२९ लाखांचा ऑनलाईन गंडा

marathinews24.com

पुणे – पोलीस असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाला मनी लॉड्रींग केस मध्ये अटक करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या बँकखात्याची संपुर्ण माहिती घेउन खाते पडताळणीच्या नावाखाली तब्बल २९ लाख १५ हजार रुपये वर्ग करुन घेत आर्थिंक गंडा घातला आहे. ही घटना १४ ते २९ ऑगस्ट २०२६ कालावधीत बुधवार पेठेत घडली आहे. (Pune Crime) याप्रकरणी ६९ वर्षीय जेष्ठाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराचा पर्दाफाश – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक बुधवार पेठेत राहायला असून, १४ ऑगस्टला सायबर चोरट्याने त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. पोलीस असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने तक्रारदाराला बँकखात्यातून मनी लॉड्रींग झाल्याची बतावणी केली. बेकायदेशीर जाहिरात करणे, फसवणूकीच्या तक्रारी प्राप्त असून, संबंधिताने तक्रारदाराला अटक करण्याची भीती घातली. त्यानंतर त्यांच्या बँकखात्यातील रक्कम तपासणीसाठी सर्व माहिती घेतली. बँकखात्यातून तब्बल २९ लाख १५ हजार रुपये वर्ग करुन घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक लाहिगुडे तपास करीत आहेत.

थुंकल्याचा वादावरून बेदम मारहाण; टोळक्याविरुद्ध गुन्हा

Pune Crime किरकोळ वादातून समोर थुंकल्यामुळे टोळक्याने दोन तरुणांना बेदम मारहाण करुन त्यांना जखमी केले आहे. ही घटना १५सप्टेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास मुंढव्यातील केशवनगरात घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी पाचजणांना नोटीस देण्यात आली आहे. तसेच अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.

विशाल रणदीवे आणि सूरज कांबळे (वय २१ रा. केशवनगर, मुंढवा) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. सूरजचे दिलेल्या फिर्यादीनुसार, कृष्णा गायकवाड (वय १९) समक्ष जाधव (वय १९ ) आदित्य गायकवाड (वय २०) अथर्व जाधव (वय १९) ओम गडवे (वय १९ सर्व रा. मुंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल रणदीवे आणि कृष्णा गायकवाड यांच्यात थुंकल्यामुळे वाद झाले होते. त्याच रागातून आरोपी कृष्णाने इतर साथीदारांना बोलावून घेतले. विशाल, सूरजला हाताने मारहाण करून लोखंडी हत्याराने उलट्या बाजूने मारहाण केली. तसेच त्याच्या डाव्या पायाच्या मांडीवर मारुन जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×