Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

Tractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यू

Tractor Accident

पिसोळीमध्ये भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

marathinews24.com

पुणे – ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून (Tractor Accident) आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पिसोळी परिसरात घडली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकासह मालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ट्रॅक्टर चालकाकडे वाहन चालविण्याचे परवाना नसल्याचे चौकशीत उघड झाले आहे.वर्षा अजय जगदेव (वय ८, सध्या रा. मासाळ चाळीजवळ, पिसोळी, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. ट्रॅक्टर चालक गणेश शंकर दिवटे (रा. सद्गुरु बिल्डींग, पिसोळी), भाऊसाहेब बाजीराव मासाळ (वय ४७, रा. मयूरी ऑप्टिमम सोसायटी, पिसोळी )  Tractor Accident यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अजय संजय जगदेव (वय २७) याने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शिरुरमध्ये हाॅटेल चालकाचा गोळ्या झाडून खून – सविस्तर बातमी 

(Tractor Accident) अजय जगदेव आणि कुटुंबीय मूळचे गुजरातमधील सूरतचे रहिवासी आहेत. जगदेव मजूरी करतो. १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास जगदेव याची मुलगी वर्षा पिसाेळीतील होले वस्ती परिसरातून निघाली होती. त्या वेळी भरधाव ट्रॅक्टरने तिला धडक दिली. ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा ट्रॅक्टर चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याची माहिती मिळाली. ट्रॅक्टर चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार रासकर तपास करत आहेत.

पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआड

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि एक काडतूस असा मु्द्देमाल जप्त करण्यात आला. अमन जमील खान (वय २७, रा. सुप्रीम लिगा सोसायटी, इनामनगर, कोंढवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खान हा सराईत आहे. तो डिलिव्हरी बाॅय म्हणून काम करतो. १८ सप्टेंबर रोजी कोंढवा परिसरात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी साईबाबानगर परिसरात खान हा थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी पुष्पेंद्र चव्हाण आणि केशव हिरवे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल सापडले.

खान याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याने पिस्तूल कुणाकडून आणले, तसेच का बाळगले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष चौधरी, प्रशांत मंडले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र गावडे, सागर पवार, हवालदार अमोल हिरवे, रवींद्र चिप्पा,कानिफनाथ कारखेले, राहुल रासगे, अमित सूर्यवंशी, रियाज पटेल, रवी जाधव, पुष्पेंद्र चव्हाण यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×