मार्केटयार्ड पोलिसांकडून तपास सुरू
marathinews24.com
पुणे – Mobile Banking Fraud : मोबाइल बॅिंकंगचा एमपीन अॅक्टिव्ह करुन सायबर चोरट्याने एकाच्या बँकखात्यातून तब्बल १० लाख रुपये इतरत्र वळवून ऑनलाईनरित्या फसवणूक केली आहे. ही घटना ४ ऑक्टोबरला मार्केटयार्डात घडली असून, याप्रकरणी ५७ वर्षीय नागरिकाने मार्वेâटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँक खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेष्ठाला अटकेची भीती दाखवली; पुण्यात सायबर चोरट्यांकडून ८ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मार्केटयार्ड परिसरात राहायला असून, ४ ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास सायबर चोरट्याने त्यांच्या बँकला जोडलेल्या मोबाइलचा ताबा घेतला. ऑनलाईनरित्या एमपीन अॅक्टिव्ह करुन बँकखात्यातील तब्बल १० लाख रुपये दुसर्या बँक खात्यात वळवून घेतले. (Mobile Banking Fraud) काही वेळानंतर तक्रारदाराला बँक खात्यातील रक्कम कमी झाल्याचा मेसेज आल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनीता नवले तपास करीत आहेत.
























