सासरच्या छळाला कंटाळून केली होती आत्महत्या
marathinews24.com
पुणे – Payal Zambre Suicide Case : प्रसिद्ध व्यावसायिक बाळासाहेब झांबरे यांच्या सुनेने सासरच्या छळाला कंटाळून २ ऑक्टोबरला गळफास घेत आत्महत्या केली. पायल अक्षय झांबरे (वय २९) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती अक्षय अरविंद झांबरे (वय ३८) याला यापूर्वीच अटक केली होती. सासू मंगल अरविंद झांबरे (वय ५८), सासरा अरविंद झांबरे (वय ६५, रा. मंगलमय, झांबरे पॅलेसजवळ, मुकुंदनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
दारुच्या नशेत पुणे पोलीस आयुक्ताच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न – सविस्तर बातमी
पायलचा भाऊ ऋषिकेश रवींद्र पवार (वय ३१, रा. खेड शिवापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायलने आत्महत्येपूर्वी सासरची मंडळी जबाबदार असल्याचे म्हटले होते. अक्षय झांबरे सध्या पोलिस कोठडीत असून, पुढील तपास स्वारगेट पोलिस करत आहेत. झांबरे कुटुंब हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिकांपैकी एक आहेत. त्यांची कार्यालये, हॉटेल्स असून, ते बांधकाम व्यवसायात देखील सक्रिय असल्याची माहिती आहे.




















