Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

शिरुर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

शिरुर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह गोलेगाव रोड, शिरुर या संस्थेत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक मुलींनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज योजनेचा ९ हजार ६२३ अर्जदारांना लाभ – सविस्तर बातमी 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ व शारिरीकदृष्ट्या दिव्यांग आदी प्रवर्गातील विद्यार्थींनींना वसतिगृहात मोफत प्रवेश देण्यात येणार आहेत.

शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थींनींना विनामुल्य भोजन व निवासाची व्यवस्था असून क्रमीक पुस्तके, शैक्षणिक साहित्य इत्यादी शासनाने ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेपर्यंतची रक्कम विद्यार्थींनीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. तसेच दरमहा निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो. शिवाय विद्यार्थीनींकरीता ई-ग्रंथालय व सुसज्ज व्यायामशाळा आदी अनेक सुविधा येथे उपलब्ध आहेत.

विद्यार्थीनी बाहेरगावची परंतू शिरुर मध्ये शिक्षण घेणारी असावी. प्रवेशासाठी मागील वर्षाची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ज्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाला आहे तेथील बोनाफाईड दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड (विद्यार्थीनीचे व वडीलांचे), शिधापत्रिकेची दुय्यम प्रत सोबत आणाव्यात. वसतीगृह प्रवेश प्रक्रिया https://hmas.mahaait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. अधिक माहितीसाठी गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, गोलेगाव रोड, पुणे-नगर हायवे, शिरुर येथे संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल  ए. एस. सूर्यवंशी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×