Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कटीबद्ध – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कटीबद्ध - पोलीस आयुक्त अमितेश कुमार

अमनोरा सिटी कॉर्पोरेशनतर्फे पोलीस दलाला ९ वाहने सुपूर्द

marathinews24.com

पुणे – पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध असून, शहरातील वाहतूक प्रश्नासह महिला सुरक्षा, रस्त्यांवरील गैरप्रकार, अनधिकृत फेरीवाले यांच्यावर कारवाई करून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दिली. सिटी कॉर्पोरेशन लि. (अमनोरा) यांनी सी. एस. आर. फंडामधून पुणे शहर पोलीस दलास ९ चारचाकी वाहने खरेदी प्रक्रिया राबवून पोलीस दलाकडे सुपूर्द केली. वाहन हस्तांतरणाचा सोहळा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत (दि. २८) अमनोरा पार्क टाऊन क्लब, हडपसरमध्ये पार पडला.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कटीबद्ध - पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुण्यात बेशिस्त वाहन चालकांवर एआय द्वारे कारवाई; वाहतूक नियमनासाठी विशेष प्राधान्य-पोलीस आयुक्त अमितेशकुमार – सविस्तर बातमी 

सिटी कॉर्पोरेशन लि. (अमनोरा)चे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी वाहनांच्या चाव्या पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी आदित्य देशपांडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पुण्यासारख्या सातत्याने विस्तारित होणाऱ्या शहरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्य करणे जबाबदारीचे आहे; परंतु तंत्रज्ञान, मनुष्यबळ यांच्यामार्फत नागरिकांचे सुरक्षा, वाहतूकप्रश्न सोडण्यासाठी पोलीसदल कटीबद्ध आहे. नागरिकांनी आमच्या कामास सहकार्य करून सहभागही नोंदविल्यास पोलीस दलाची कार्यक्षमता वाढण्यास तसेच शहराला शिस्त लागण्यास मदत होईल.

नागरिकांनी मोकळेपणाने आपल्या अडचणी आणि प्रश्न 112 या क्रमांकावर पोलीस विभागाकडे मांडावे. प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत रहावा. आम्ही त्याचे कायमस्वरूपी निराकरण करण्याचा प्रयत्न करू. परिसरात रस्त्यावर, पादचारी मार्गांवर स्पिकरवर मालाचा भाव सांगत, आरडाओरडा करून वस्तूंची विक्री करणारे फेरीवाले पाहण्यात आले. अशा प्रकारे रस्तेवाहतूक आणि नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कटीबद्ध - पोलीस आयुक्त अमितेश कुमार

अनिरुद्ध देशपांडे यांनी अमनोराच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, महिलांचे सबलीकरण, पाणी बचतीचा संदेश, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात कार्य केले जात आहे. आरोग्य उपक्रमांतर्गत 1200 महिला पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. अमनोरा येथील घरेलु कामगार महिलांना (अवंतिका) पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले असून येत्या वर्षभरात शंभर कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प करण्यात आला आहे.

खामगाव येथे पारधी मुलांच्या शाळेची जबाबदारी घेण्यात आली असून तेथील 150 विद्यार्थ्यांना कौशल्यविकास उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षित करण्यात आले असून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी पोलीस दल सतत कार्यरत असते. यात महिला पोलीस शक्तीचा मोठा वाटा आहे सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रात प्रथमच पोलीस दलात वाहने उपलब्ध करून दिली आहेत.

महिला पोलीस सारथ्य करत असलेल्या ९ वाहने पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अनिरुद्ध देशपांडे, आदित्य देशपांडे हिरवा झेंडा दाखविला. वाहने पोलीस दलात सामिल करून घेण्यात आली. सूत्रसंचालन स्नेहल जाधव, तहसीन बेग यांनी केले. तर आभार डॉ. राजकुमार शिंदे यांनी मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×