Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

बनावट कागदत्रांद्वारे शस्त्र परवाना, हगवणे बंधूंवर गुन्हा

खोट्या कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना मिळवला; हगवणे बंधूंवर कारवाई

marathinews24.com

पुणे – शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुणे पोलिसांना बनावट कागदपत्रे सादर करून परवाना मिळवल्याप्रकरणी दिवंगत वैष्णवी हगवणे यांचा पती शशांक आणि दीर सुशील हगवणे विरोधात गुरुवारी (दि. २९) रात्री उशिरा वारजे आणि कोथरूड पोलिस ठाण्यात फसवणुकीचे दोन स्वतंत्र गुन्हे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली आहे. त्यानंतर हगवणे बंधूंविरोधात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. याबाबत कोथरूड आणि वारजे पोलिस ठाण्यातील पोलिसांनी फिर्यादी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या दीपक मानकर यांच्या मुलासह व्याहीविरूद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हगवणे बंधूंनी शस्त्र परवाने मिळवण्यासाठी आवश्यक असलेली पार्श्वभूमी तपासणी प्रक्रियेत खोटी माहिती दिली होती. खोट्या माहितीनंतर त्याला शस्त्र परवाना मिळाला होता. शस्त्र परवाना मिळवताना दोघांनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानंतर माहितीची शहानिशा केली. कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल केला.

परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

शशांक, दीर सुशील हगवणे, तसेच निलेश चव्हाण यांनी २०२२ मध्ये पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळविला होता. तिघांचे पिस्तूल जप्त करण्यात आले असून, त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शशांक आणि सुशील हगवणे यांनी पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुण्यातील निवासाचा पत्ता दिला. या दोघांनी वारजे आणि कोथरूड पोलिस ठाण्यात शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केले होते. वास्तव्याचा पुरावा म्हणून दोघांनी भाडेकरार पोलिसांना दिल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×