Breking News
तर थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना जबाबदार धरणार-पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारासिंधुताईंच्या आश्रमातील मुली लग्नासाठी देतो केली फसवणूक उपविभागीय कार्यालय बारामती व इंदापूर तहसिल कार्यालयात 9 जूनला लोकअदालतीचे आयोजनइंदापूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहनचांडोली येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहनभरदिवसा पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावलेजीवनसाथीवरून झाली ओळख, लग्नाच्या आमिषाने २५ लाखांचा गंडाविभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तिमाही बैठकीचे सोमवारी आयोजनइमारतीच्या पेटिंगचे काम करताना पडला, तरुण पेंटर ठार झालाBike Accident : भरधाव दुचाकी घसरून तरूणाचा मृत्यू, सहकारी जखमी

कोथरूडमध्ये घरफोडी, १७ लाखांचे दागिने चोरीला

पुणे शहरात घरफोडीचे सत्र कायम

२४ वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल केली फिर्याद

marathinews24.com

पुणे – बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील तब्बल १७ लाख २० हजारांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना ३० ते ३१ मे कालावधीत कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनीतील व्यंकटेश्वरा अपार्टमेंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी २४ वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठेची सोन्याची पाटली चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनीतील व्यंकटेश्वरा अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत. ३० ते ३१ मे कालावधीत कामानिमित्त महिला फ्लॅट बंद करून बाहेरगावी गेली होती. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील १७ लाख २० हजारांचे दागिने चोरून नेले. गावाहून आल्यानंतर महिलेला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सानप तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top