Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

पहिल्याच पावसात शहर खड्डेमय

पहिल्याच पावसात शहर खड्डेमय

केवळ ५०८ खड्डे असल्याचा महापालिकेचा दावा

marathinews24.com

पिंपरी – पहिल्याच पावसात पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचून चिखल व खड्डी निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे विविध भागात तब्बल ५०८ खड्डे पडले. पावसाळ्यापूर्वी ८५५ असे एकूण १ हजार ३५६ खड्डे शहरात आढळले. त्यापैकी ८४८ खड्डे बुजविले असून, ५०८ खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

चुलत्याचा खून, चुलतभावावर प्राणघातक हल्ला – सविस्तर बातमी 

पावसाळ्यातील चार महिने वगळता शहरातील विविध भागात पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युत, गॅस वाहिनी, नेटवर्किंग, सीसीटीव्ही कॅमेरे, स्मार्ट सिटी, महामेट्रो, अर्बन स्ट्रीट डिजाईन अशा विविध प्रकल्पांसाठी रस्ते खोदाई केली जाते. रस्ते खोदाईसाठी १५ मे अखेरपर्यंत महापालिकेची मुदत होती. मुदतीनंतर रस्ते खोदाई केल्यास दंड आणि गुन्हे दाखल करण्याचा महापालिकेने इशारा दिला होता. मात्र, अत्यावश्यक बाब म्हणून पावसाळ्यातही रस्ते खोदाई सुरूच आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. त्यावरून रस्त्यांचा तसेच, रस्ते दुरुस्तीचा दर्जा किती सुमार आहे, हे स्पष्ट होत आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत ८५५ खड्डे आढळले. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे सात ते आठ दिवस अधून-मधून जोरदार पाऊस पडत होता. या पावसामुळे शहरभरात मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर तब्बल ५०१ खड्डे पडल्याचे महापालिकेच्या पाहणीत समोर आले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना खड्यातून वाट काढावी लागत आहे. खड्ड्यांच्या बाजूला खडीमुळे वाहने घसरून अपघाताच्या घटना घडत आहेत. पावसाळ्यापूर्वी आणि मागील आठवड्यात असे एकूण पडलेल्या १ हजार ३५६ खड्ड्यांपैकी ८४८ खड्डे बुजविल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

त्यामध्ये डांबर आणि कोल्ड मिक्सने ४४४, बीबीएमने म्हणजे खडीने ३६, पेव्हिंग ब्लॉकने २८८, सिंमेंट काँक्रीटने ४२ असे ८४८ खड्डे पूर्णपणे बुजविले आहेत. शहरात फक्त ५०८ खड्डे बुजवायचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. पाऊस कमी झाल्याने खड्डे बुजविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

संबंधित ठेकेदारांकडून खड्डे भरून घेणार

पीसीएमसी पॉटहोल मॅनेजमेंट या अ‍ॅपमध्ये खड्ड्यांची नोंद होत आहे. एखाद्या रस्त्यावर पुन्हा खड्डा पडल्यास अ‍ॅपमध्ये दिसेल. त्यामुळे एका ठिकाणी दोनदा खड्डा पडल्यास संबंधित अधिकारी, ठेकेदारावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. रस्त्याच्या किरकोळ कामाला एक वर्षे, डांबरी रस्त्याला तीन आणि सिमेंटच्या रस्त्याला पाच वर्षे दोष दायित्व निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडल्यास ते संबंधित ठेकेदरांकडून दुरुस्त करून घेण्यात येणार आहेत, असे महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×