Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

मोटार चालकाची मुजाेरी; अपघातानंतर एकाला फरफटत नेले

मोटार चालकाची मुजाेरी; अपघातानंतर एकाला फरफटत नेले

पाेलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न

marathinews24.com

पुणे– खराडी बायपास चौकात भरधाव मोटारीने एका मोटारीला धडक दिली. अपघातानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या मोटार चालकाला अपघातग्रस्त मोटार चालकाने अडविण्याचा प्रयत्न केला. पसार होण्याच्या तयारीत असलेल्या मोटार.चालकाने त्याला फरफटत नेले, तसेच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

गावठी दारू विक्री प्रकरणात दोघे अटकेत – सविस्तर बातमी 

याप्रकरणी मोटारचालक विष्णू साबळे (वय २२, पिंपरी सांडस, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई सचिन चव्हाण यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी बायपास चौकातून मोटर चालक विष्णु साबळे हा मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास भरधाव वेगाने निघाला होता. त्यावेळी त्याच्या मोटारीने एका मोटारीला पाठीमागून धडक दिली. मोटारीचे नुकसान झाल्याने चालक उतरला.

त्याने मोटार चालक साबळे याला अडविण्याचा प्रयत्न केला. साबळेने मोटार चालकाच्या अंगावर गाडी घातली. मोटार चालकाला फरफटत नेले. त्यावेळी साबळेला पोलीस शिपाई चव्हाण यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. साबळेने चव्हाण यांच्या अंगावर मोटार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी साबळेला पकडले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×