Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

लोणावळा परिसरात वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

लोणावळा परिसरात वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून दुर्घटना घडू नये; याकरिता सुरक्षिततेच्यादृष्टीने आदेश जारी

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील लोणावळा परिसरात ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी ठिकाणी वर्षाविहार, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी व अपघात होऊ नये, तसेच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून दुर्घटना घडू नये याकरिता सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पर्यटनस्थळ परिसरात ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ मधील तरतूदीनुसार व गृह विभागाच्या १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार वाहतुकीमध्ये बदल करुन पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतच्यादृष्टिने स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे-पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी 

लोणावळा परिसरातील एकविरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना धरण या परिसरात प्रामुख्याने पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. अशावेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सदर आदेश देण्यात आले आहेत.

मौजे भाजे गावाकडून येणारी वाहतुक मौजे मळवली-कार्ला गावाकडे जाण्यासाठी वाहतूक बंद करण्यात येत असून, त्याऐवजी पर्यायी मार्गाने मौजे भाजे येथून पाटण ब्रिजवरुन डावीकडे देवले औंढे ब्रिजहून पुढे सर्व्हिस रोडने कुसगाव लोणावळा येथून जुना हायवे व एक्सप्रेस हायवेकडे जातील.

मौजे औंढे-देवले रोडने मळवली भाजे येथे येणारी वाहतूक बंद करण्यात येत असून, त्याऐवजी पर्यायी मार्गाने मौजे औंढे-लोणावळा-कर्ला फाटा-मळवली-भाजे अशी जातील.

मोजे मळवली व मौजे सदापूर येथून मौजे कार्ला येथे येणारी वाहतुक बंद करण्यात येत असून, त्याऐवजी पर्यायी मार्गाने मौजे मळवली-सदापूर-वाकसई फाट्यावरुन जुन्या हायवेकडे जातील.

मौजे वाकसई फाटा येथून सदापूर मळवली कडे जाणारी वाहने बंद करण्यात येत असून, त्याऐवजी पर्यायी मार्गाने मौजे कार्ला फाटा येथून सरळ पुढे मळवली, पाटण, माजे अशी वाहने जातील. मौजे भाजे ते लोहगड या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात येत असून, लोहगडाकडे जाण्यासाठी भाजे येथून पर्यायी मार्ग असेल.

लोहगड येथून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनांनी लोहगड-दुधिवरे खिंड-औंढोली-औंढे यामार्गे पुणे-मुंबई व मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे या मार्गाचा किंवा लोहगड-दुधिवरे-खिंड-पवनानगर या मार्गे नवीन पुणे-मुंबई व मुंबई-पुणे हायवे या मार्गाचा वापर करावा. तसेच लोहगड येथून मुंबई किंवा पुणेकडे जाणारी दोनचाकी व तीनचाकी वाहनांनी लोहगड-दुधिवरे-खिंड-औढोली-आँढे-आँढे ब्रीजवरुन कुसगाव-लोणावळा येथून जुना मुंबई-पुणे व पुणे-मुंबई या मार्गाचा वापर करावा.

या कालावधीत जुना मुंबई-पुणे व पुणे-मुंबई रोडवरील कार्ला फाटा ते वेहेरगाव या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. वाहतूक बदलाबाबतचे आदेश स्थानिक रहिवाश्यांना लागू नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×