Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

बंद पडलेल्या एसटीमधून १८० लीटर डिझेलची चोरी

बंद पडलेल्या एसटीमधून १८० लीटर डिझेलची चोरी

पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडीतील घटना

marathinews24.com

पुणे – रस्त्यात बंद पडलेल्या एसटी बसमधून चोरट्यांनी डिझेल चोरुन नेल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडी परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एसटी बसचालक रमेश पोटभरे (वय ५२, रा. एसटी कॉलनी, पुणे-सातारा रस्ता) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फ्लॅटमधून ७ लाखांचा ऐवज लांबविला, वाघोलीतील घटना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटभरे हे पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारातून १७ जून रात्री प्रवाशांसह तुळजापूरला निघाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी गावाजवळ एसटी बसमध्ये बिघाड झाला. त्यामुळे एसटी बसचालक पोटभरे आणि वाहकाने बस ताम्हाणे वस्ती परिसरातील एस फोर जी हॉटेलसमोर रात्री एसटी उभी केली होती.

हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत त्यांनी बस उभी केली होती. चोरट्यांनी मध्यरात्री एसटी बसच्या डिझेल टाकीचे झाकण उघडून त्यातील डिझेल चोरले. शेजारी लावलेल्या टँकरच्या टाकीचे झाकण उघडून चोरट्यांनी डिझेल चोरले. एसटी बस आणि टँकरमधून एकुण मिळून १८० लिटर डिझेल कॅनमध्ये भरुन चोरटे पसार झाले. चोरलेल्या डिझेलची किंमत ३० हजार रुपये असून, पोलीस हवालदार सातपुते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×