Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

जुन्या भांडणातून लॉड्री व्यावसायिकाला मारहाण, चौघांना अटक

क्रेन ऑपरेटरवर हल्ला; फायनान्स रिकव्हरी एजंटसह तिघांविरुद्ध गुन्हा

उरळी देवाची परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून लाँड्री व्यावसायिकाला बेदम मारहाण करणार्‍या टोळक्याला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १६ जूनला संध्याकाळी सहाच्या सुमारास उरळी देवाची परिसरातील भाजी मंडई परिसरातील दुकानात घडली होती. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक केली आहे.

खर्चासाठी पैसे न दिल्यामुळे आईलाच केली बेदम मारहाण – सविस्तर बातमी 

मेन बाबू मोहम्मद हबीब सलमानी (वय २९ रा. उरळी देवाची, हवेली) रफिक मोहम्मद हबीब सलमानी (वय ४०) मोहम्मद सद्दीक मोहम्मद हबीब सलमानी (वय ३२) इम्रान इदू सलमानी (वय २४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पवनकुमार कनोजिया (वय २८, रा. फुरसुंगी )यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार पवनकुमार हा लाँड्री व्यावसायिक असून, आरोपी सलमानी उरळी देवाची परिसरात राहायला आहेत. त्यांच्यात काही दिवसांपुर्वी वादविवाद झाले होते. त्याच रागातून सलमानी कुटूंबियाने पवनकुमारला १६ जूनला लाँड्रीच्या दुकानात गाठले. त्यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. याप्रकरणी पवनकुमारने तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पथकाने चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×