Breking News
रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खून

डेक्कन पोलीस ठाण्यातील दोघे कर्मचारी निलंबित

डेक्कन पोलीस ठाण्यातील दोघे कर्मचारी निलंबित

मैत्रिणीसोबत थांबलेल्या तरुणाकडून उकळले पैसे

marathinews24.com

पुणे – मैत्रिणीसोबत मोटारीत गप्पा मारत थांबलेल्या तरुणाला धमकावून २० हजार रुपये उकळणारे डेक्कन पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश परिमंडळ एकचे प्रभारी पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी दिले. गणेश तात्यासाहेब देसाई, योगेश नारायण सुतार अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने तक्रार दिली होती.

रिक्षाचालकाडून दुचाकीस्वार तरुणावर वार, शिवणे भागातील घटना – सविस्तर बातमी 

तक्रारदार वारजे भागात राहायला असून, विधी महाविद्यालय रस्त्यावरील दामले पथ परिसरात मंगळवारी रात्री मैत्रिणीसोबत मोटारीत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी रात्रपाळीत पोलीस कर्मचारी गणेश देसाई, योगेश सुतार हे गस्त घालत होते. कर्मचारी देसाई आणि सुतार तेथे आले. ‘तुमच्याबद्दल तक्रार आली आहे,’ असे त्यांनी सांगितले. ‘पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरण न्यायचे नसेल, तर २० हजार रुपये द्या,’ अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी देऊन तक्रारदार मोटार चालकाला दुचाकीवर घेऊन पोलीस कर्मचारी देसाई आणि सुतार कमला नेहरू पार्क परिसरातील एटीएममध्ये नेले. तेथे त्याच्याकडून २० हजार रुपये घेतले.

घटनेनंतर घाबरलेला मोटारचालक आणि त्याच्या मैत्रिणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी देसाई आणि सुतार यांची चौकशी करण्यात आली. डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी दोघांचा अहवाल पोलीस उपायुक्त पिंगळे यांच्याकडे पाठविला. ज्या कायद्याचे उल्लंघन त्यांनी केले होते, त्यानुसार कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देणे गरजेचे होते. मात्र, देसाई आणि सुतार यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली नाही. त्यांच्या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवून दोघांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त पिंगळे यांनी दिले.

बोपदेव घाटात छायाचित्रणासाठी गेलेल्या तरुणाला धमकावून त्याच्याकडून पैसे उकळणाऱ्या कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना नुकतीच अटक करण्यात आली होती. याप्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×