Breking News
मोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खूनअण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीससोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदलसाहित्यरत्न लोकशातिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसध्येला समाजरत्न पुरस्कार समारंभपुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणालीबालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण करण्यास उपयुक्त-प्रदीप देसाईखराडी पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई एकतर्फीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना; यवतमध्ये ३१ जुलैला रस्ता रोको

तरुणाचा खुनाचा प्रयत्न; पसार झालेला सराइत अटकेत

देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

marathinews24.com

पुणे -.  तरुणाचा खुनाचा प्रयत्न; पसार झालेला सराइत अटकेत – तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन पसार झालेल्या सराइताला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आले. विनीत रवींद्र इंगळे (वय २४, रा. सातववाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ – पहिली ट्रायल रन यशस्वी! – सविस्तर बातमी

वैमनस्यातून विनीत इंगळे, साथीदारांनी दीपक विजय कलादगी (वय २१, रा. पवार काॅलनी, हडपसर) याच्यावर २० मार्च राेजी तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. या घटनेत कलादगी गंभीर जखमी झाला होता. गेले चार महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता. ३० जून रोजी इंगळे हा हडपसर भागातील लाेहिया गार्डनजवळ थांबल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी महेश चव्हाण आणि अभिजित राऊत यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आले.

परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस कर्मचारी अविनाश गोसावी, संदीप राठोड, दीपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निलेश किरवे, निखिल पवार, भगवान हंबर्डे, बापू लोणकर, अमोल दणके, अजित मदने यांनी ही कारवाई केली.

ओैंध भागात दहशत माजवणारे सराइत गजाआड

ओैंध भागात दहशत माजवून पसार झालेल्या सराइतांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. सराइतांकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तीन काेयते. मोटार, दुचाकी असा सात लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रतीक सुनील कदम (वय २६), अमीर अल्लाउद्दीन शेख (वय २८), , समीर अल्लाउद्दीन शेख (वय २६), जय सुनील घेंगट (वय २१), अभिषेक अरुण आवळे (वय २४, सर्व रा. कस्तुरबा गांधी वसाहत, ओैंध), अतुल श्याम चव्हाण (वय २८, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, ओैंध), राॅबिन दिनेश साळवे (वय २६, रा. दर्शन पार्क, ओैंध) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत एका तरुणाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार तरुण आणि त्याचे मित्र ओैंधमधील विधाते वस्ती भागात २८ जून रोजी गप्पा मारत थांबले होते. आरोपी आणि फिर्यादी तरुणाचा किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. आरोपी आणि त्यांच्याबरोबर असलेले साथीदार विधाते वस्ती परिसरात आले. तरुण, तसेच त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना शिवीगाळ केली. दांडके आणि कोयते उगारून परिसरात दहशत माजविली.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top