कोंढवा पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
Pune Crime : वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांना केले अटक, ८ वाहने जप्त – शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ रिक्षा, ७ दुचाकी अशी सव्वा दोन लाखाची वाहने जप्त केली आहेत.प्रल्हाद मुंजाजी ईखे, वय २३ रा. कोंढवा आणि गजानन उर्फ राज दत्ता खटपटे (वय २४ ) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
शस्त्राच्या धाकाने मोबाईल चोरणार्या टोळक्याला बेड्या – सविस्तर बातमी
तक्रारदाराने शालीनी सुपर मार्केट लक्ष्मीनगर, कोंढव्यात रिक्षा लॉक व पार्क केली होती. चोरट्यांनी त्यांची रिक्षा चोरून नेली होती. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सहायक निरीक्षक राकेश जाधव, अंमलदारांसह आरोपीचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर, विकास मरगळे, विजय खेंगरे यांना हा गुन्हा प्रल्हाद ईखे व गजानन खटपटे दोघे रा.भैरवनाथ मंदिर शेजारी, कोंढवा बु., यांनी केला असल्याची माहिती मिळाली.
दोघे चोरी केलेली रिक्षा घेवून खडीमशिन चौकाचे पुढे पिसोळी रोड येथे थांबले आहेत, अशी बातमी मिळाल्याने तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दोघांना ताब्यात घेऊन १ रिक्षा व एकुण ७ दुचाकी वाहने जप्त केली. दोघांविरुद्ध कोंढवा पोलीस ०५, लष्कर पोलीस १, खराडी पोलीस १ व भोर १ गुन्हा असे ८ गुन्हे दाखल आहे. त्यांच्याकडुन सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.






















