Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

पिंपरी चिंचवडमध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर

पिंपरी चिंचवडमध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर

महेश टेळेपाटील यांची फेरनिवड, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान

marathinews24.com

पिंपरी चिंचवड – डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची बहुप्रतीक्षित कार्यकारिणी बैठक बुधवार, २३ जुलै रोजी हॉटेल कुणाल, तापकीर चौक, काळेवाडी, पिंपरी चिंचवड येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर नवीन कार्यकारणी राज्य समन्वयक अमोल पाटील यांच्या पुढाकाराने जाहीर करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बालेवाडी, पाषाण, सुस येथे महारक्तदान शिबिर संपन्न – सविस्तर बातमी 

बैठकीला संस्थापक अध्यक्ष राजा माने, महाराष्ट्र सरचिटणीस महेश कुगावकर, प्रदेश उपाध्यक्ष सावंत साहेब, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, राज्य समन्वयक अमोल पाटील,पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश हुंबे, पुणे शहर अध्यक्ष महेश टेळेपाटील, पिंपरी चिंचवड अध्यक्ष प्रशांत साळुंखे आदी पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर, संपादक, आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘न्यूजमेकर.लाईव्ह’चे संपादक महेश टेळेपाटील यांची पुणे शहराध्यक्ष पदावर फेरनिवड बिनविरोध करण्यात आली. त्यांच्या गतकाळातील सक्रिय सहभाग आणि नेतृत्वगुण यांची संघटनेने एकमुखाने दखल घेतली. त्यांच्यासह विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कार्यकर्त्यांचीही कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी संघटनेच्या ध्येयधोरणांचा परिचय देताना सांगितले की, “डिजिटल पत्रकारितेचा सन्मान राखण्यासाठी आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी ही संघटना कायमच सजग राहील.” अध्यक्ष गणेश हुंबे आणि प्रशांत साळुंखे यांनीही नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमात सर्व पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले. या निमित्ताने उपस्थितांनी एकमेकांशी संवाद साधत आगामी काळात पत्रकारांच्या समस्यांवर एकत्रितपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी महेश टेळेपाटील यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आणि सांगितले की, “पद हे केवळ भूषवण्यासाठी नसून, ते जबाबदारीने पार पाडण्यासाठी असते. आपण सर्वांनी एकजुटीने पत्रकारांच्या हितासाठी काम केले पाहिजे. कार्यक्रम केवळ संघटनेचा औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर एकता, समन्वय आणि पत्रकारांच्या आत्मसन्मानाचा संदेश देणारी महत्वपूर्ण घडामोड ठरली.

पुणे शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

शहराध्यक्ष : महेश टेळेपाटील (न्यूजमेकर. लाईव्ह) कार्याध्यक्ष : विजय रणदिवे (सुदर्शन टीव्ही)
कार्याध्यक्ष : प्रयाग डिंगणकर (PPC News)
उपाध्यक्ष : नागेश होनमाने (झुमॲान न्यूज)
उपाध्यक्ष : संतोष गाजरे (दैनिक लोकमत)
संपर्क प्रमुख : लहु पारवे (जनसुराज्य), प्रशांत नाईक उर्फ स्वर प्रशांत (कलाकार वार्ता) महिला संपर्क प्रमुख : मंजुषा अवलकंठे (विश्वभारती) सरचिटणीस : दिनेश वढणे (INS) संघटक : शिवाजी हुलावळे (छत्रपती न्यूज), रामचंद्र कुंभार (संध्या न्यूज)
सचिव : रोहित दळवी (द आधुनिक केसरी)
मिडिया प्रचार प्रमुख : धारा इंगोले, सल्लागार मंडळ : धनराज गरड (युवा संवाद)
प्रसिद्धी प्रमुख : अतुल येवले शहर कार्यकारिणी सदस्यपदी खालील सदस्यांची निवड झाली: विनोद पडेलकर (न्यूजमेकर.लाईव्ह), हरिश दंडाले (PPC News), हनुमंत टेळे (उनाड न्यूज), प्रशांत जंगम (डिजिटल न्यूज, पुणे), प्रयाग डिंगणकर,पराग डिंगणकर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×