डेटिंग अॅपवर दोस्ती महागात, विश्वास ठेवल्याने गमावले २५ लाख!
Marathinews24.com
पुणे – डेटींग अॅपवरून झालेली ओळख एका तरूणाला चांगलीच महागात पडली आहे. संबंधित सायबर चोरट्यांनी तरूणाचा विश्वास संपादित करून त्याला कमाईचे आमिष दाखवून तब्बल २५ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ८ सप्टेंबर ते २१ डिसेंबर २०२३ कालावधीत कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी अनुम घाडगे (वय ३३) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनुप हे कोंढवा परिसरात राहायला असून, ८ सप्टेंबरला त्यांची एका डेटींग अॅपवरून आरोपीची ओळख झाली होती. त्यांचात काही दिवस संवाद झाल्यामुळे एकमेकांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर आरोपीने अनुपला कमाईचे आमिष दाखवून गुंतवणूकीवर भर देण्यास सांगितले. आरोपीच्या सांगण्यानुसार अनुपने गुंतवणूकीला प्राधान्य दिले. तब्बल २५ लाख रूपये जमा करूनही त्यांना काहीच फायदा झाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अब्दुल शेख तपास करीत आहेत.