Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

लव्हस्टोरी, घोस्ट कॉमेडीचा धमाका…

लव्हस्टोरी, घोस्ट कॉमेडीचा धमाका...

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

marathinews24.com

पुणे – प्रेम, भूत आणि हास्याचा भन्नाट मेळ घालणारा आगामी मराठी चित्रपट ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. या घोस्ट कॉमेडीचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आले आहे. सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू ही हटके जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर धमाल उडवायला सज्ज झाली आहे. या आधी ‘पालतू फालतू’ या मजेशीर गाण्यामुळे आणि ‘ना कळले कधी तुला’ या भावनिक गीतामुळे चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झालं होतंच, परंतु आता आलेल्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांना या प्रेमकथेच्या गोंधळातल्या धमाल प्रवासाची झलक पाहायला मिळाली आहे.

“टँगो मल्हार” चित्रपटातून उद्योजिका, शास्त्रज्ञाचे मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण – सविस्तर बातमी 

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत, रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक वेगळी आणि हटके प्रेमकथा उलगडताना दिसते. सुबोध भावे याची ‘बेटर-हाफ’ म्हणजे पत्नी गेल्यानंतर तिचा आत्मा त्याच्याच शरीरात वास करत असल्याचं गोंधळलेलं चित्र ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. त्यातून सुटका मिळवण्यासाठी सुरू होतो विनोदी संघर्ष, ज्यात प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांची त्याला साथ मिळते. आता यातून सुबोध भावाची सुटका होते का, याचे उत्तर मात्र प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.

दिग्दर्शक संजय अमर या चित्रपटाविषयी सांगतात, “ही घोस्ट कॉमेडी असली तरी ती एका आगळ्यावेगळ्या प्रेमकथेची सांगड घालते. कलाकारांच्या ताकदीमुळे ही संकल्पना पडद्यावर प्रभावीपणे साकारता आली. सुबोध आणि रिंकूची फ्रेश जोडी, प्रार्थना आणि अनिकेतसारखे अनुभवी कलाकार यांचं योगदान अमूल्य आहे.”

चित्रपटाचे निर्माता रजत अग्रवाल म्हणतात, “आजच्या पिढीला नेहमी काहीतरी हटके आणि नाविन्यपूर्ण बघायचं असतं. ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. यामध्ये विनोद, सस्पेन्स, भावना आणि स्टारकास्ट यांचं परिपूर्ण मिश्रण आहे.”

या चित्रपटाचे लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांचेच असून, साजन पटेल आणि अमेय नरे यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे. सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्यासारख्या दमदार कलाकारांच्या अभिनयाने साकारलेला हा सिनेमा येत्या २२ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×