Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुणे पोलिस आयुक्तांनी केला मुख्यमंत्र्यांना फोन अन् प्रश्न सुटला

पुणे पोलिस आयुक्तांनी केला मुख्यमंत्र्यांना फोन अन् प्रश्न सुटला

शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो…

marathinews24.com

पुणे – पुणे पोलिस आयुक्तांनी केला मुख्यमंत्र्यांना फोन अन् प्रश्न सुटला – शहरातील मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाशेजारील जागा खासगी विकसकाला देण्याच्या निर्णयाविरोधात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते एकवटले असून, शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,’ अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून दिली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सूत्रे हलवण्यात आली अन् विकसकाच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय झाला.

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर – सविस्तर बातमी 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची मोक्याची जागा खासगी बांधकाम व्यावसायिकाला ६० वर्षाच्या भाडेकराराने देण्याचा निर्णय झाला होता. या जागेवर कॅन्सर रुग्णालय प्रस्तावित होते. याबाबत माध्यमांनी सातत्याने आवाज उठवला होता. दरम्यान, या निर्णयाला आंबेडकरी चळवळीचा विरोध वाढला होता. स्वातंत्र्य दिनी शहरात मोठे आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला होता आणि त्यानुसार जय्यत तयारी देखील करण्यात आली होती. या सर्व परिस्थिती आढावा घेऊन पोलिस आयुक्तांनी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. मात्र, ते आंदोलनावर ठाम असल्याचे दिसून आले. पोलिस आयुक्तांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सर्व तपशील सांगितला. त्यानंतर काही तासांतच जागेच्या वापराबाबत स्थगिती आदेश काढण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×