वाघोलीत बकोरी येथे कारवाई
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागात अमली तस्करांकडून ड्रग्जची विक्री केली जात असल्याचे दिसून आले आहे. पेडलरांनी ड्रग तस्करीचा ओघ सुरूच ठेवला असून, नुकताच गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक २ आणि गुन्हे शाखेच्या युनिट सहाने वाघोली येथील बकोरीमधील तांबे वस्तील गुलमोहर पार्कच्या मार्गे कारवाई करत ७६ लाखांचे मेफेड्रॉन जप्त केले. कारवाईत ३५१ ग्रॅम ५०२ मिलीग्रॅम जप्त करण्यात आले. तर राजस्थान येथील दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. रामेश्वरलाल मोतीजी आहिर (४५) आणि नक्षत्र हेमराज अहिर (२५, दोघेही रा. अहिल मोहल्ला, पोस्ट लोठीयाना, चित्तोडगड, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ दाम्पत्याची २४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
१५ ऑगस्टला कारवाई करण्यात आली. आरोपींकडे असलेल्या स्वीफ्ट कारमधून ह्या अमली पदार्थाची तस्करी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक, पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, युनिट ६ चे पोलिस निरीखक वाहीद पठाण, सहायक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक, राकेश कदम, मदन कांबळे व पोलिस अमंलदार ऋषीकेश ताकवणे, प्रशांत बोमादंडी, संंदिप शेळके, संदिप जाधव, नितीन जगदाळे, दिनेश बास्टेवाड, कानिफनाथ कारखेले यांच्या पथकाने ही कारवाई केली.






















