अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात एकाला अटक

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात एकाला अटक

भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक 

marathinews24.com

पुणे – अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाला तीन वर्षानंतर वाचा फुटली. मुलीला धमकावून तिची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली. तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली. संजय चिंदबरम कुलकर्णी (वय ४४, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) याला अटक करण्यात आली. याबाबत तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहकारनगर भागात महिलेचे दागिने हिसकावले – सविस्तर बातमी  

आरोपी कुलकर्णी पीडीत तरुणीच्या कुटुंबीयांचा ओळखीचा आहे. पीडीत तरुणी १६ वर्षांची असताना आरोपी कुलकर्णीने ओळखीचा गैरफायदा घेतला. कुलकर्णीने तिची मोबाइलवर छायाचित्रे काढली होती. ही छायाचित्रे सोशल मीडियावर वेळोवेळी प्रसारित करण्याची धमकी देऊन देऊन कुलकर्णीने गेले तीन वर्ष तिच्यावर अत्याचार केले. कुलकर्णी याच्या अत्याचारांमुळे घाबरलेल्या तरुणीने नुकतीच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, बालकांचे लैंंगिक अत्याचारांपासून संरक्षण प्रतिबंध कायदा (पोक्सो), तसेच बलात्कार प्रकरणी कुलकर्णी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कुलकर्णीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×