वाघोली भागातील घटना
marathinews24.com
पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वनाथ सुभाष मोकलवार (वय ३३, रा. जीवनतारा हाॅस्पिटलजवळ, आव्हाळवाडी रस्ता, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेणुका विश्वनाथ मोकलवार (वय ३३) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिरूर परिसरात अपघातात, एकाच कुटुंबातील तिघे ठार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ आणि त्यांचा लहान भाऊ युवराज हे न शिरूर परिसरात अपघातात, एकाच कुटुंबातील तिघे ठार – सविस्तर बातमी गर रस्त्यावरील वाघोली परिसरातून १६ ऑगस्ट रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास निघाले होते. विश्वनाथ यांचा लहान भाऊ युवराज हा कर्णबधीर आहे. रस्ता ओलांडत असताना विश्वनाथ यांना भरधाव वाहनाने धडक दिली. सुदैवाने या घटनेत विश्वनाथ यांचा लहान भाऊ युवराज वाचला. त्याला किरकोळ दुखापत झाली. अपघातनंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला.
अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या विश्वनाथ यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक राघू तपास करत आहेत.























