Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

पशुसंवर्धन विभागाच्यावतीते प्रतिबंधात्मक उपाययोजना; ९४ हजाराहून अधिक जनावरांचे लसीकरण

पशुसंवर्धन विभागाच्यावतीते प्रतिबंधात्मक उपाययोजना; ९४ हजाराहून अधिक जनावरांचे लसीकरण

लंम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना

marathinews24.com

बारामती – लंम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून आज अखेर ९४ हजाराहून अधिक पशुधनांचे लसीकरण करण्यात आले आहेत, जनावरांवर लंम्पी आजारसदृश्य लक्षणे आढळल्यास पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. धनंजय पोळ यांनी केले आहे.

ज्ञानाच्या दरबारात विज्ञानाची प्रतिष्ठापना- पराग ठाकूर – सविस्तर बातमी 

तालुक्यात एकूण १ लाख २० हजार २६१ गोवर्गीय पशुधन असून त्यापैकी ९४ हजार ७०७ इतक्या पशुधनांचे लसीकरण करण्यात आले आहे, उर्वरित पुशधंनाना लसीकरणाची कार्यवाही सुरु आहे. लंम्पी आजाराग्रस्त जनावराची संख्या एकूण ४६ असून उपचाराअंती बरे झालेली ३१ तर ४ जनावरांचा मृत्यू झाला आहे तसेच उर्वरित ११ जनावरांवर उपचार सुरु आहेत. दवाखान्यात २० हजार लसीचा साठा उपलबध् असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जनावरांचे लसीकरण करण्यासोबतच त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येत आहे.

लम्पी आजाराविषयी

कॅप्री पॉक्स विषाणूपासून गाय, वासरे, बैल गोवर्गीय जनावरांना लंम्पी आजाराचा संसर्ग होतो. डास, माशा,गोचीडापासून या आजाराचा प्रसार होते. आजारी जनावरांच्या अंगावर गाठी, ताप, डोळे व नाकातून स्राव, वजन कमी होणे, दुधात घट अशी लक्षणे आढळून येतात. या कालावधीत जनावरांचे विलिगीकरण करुन घ्यावे, त्यांना शुद्ध सकस आहार देण्यात यावा, आजारी जनावरांची विशेष काळजी घ्यावी. लम्पी आजाराबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात येत असून पशुपालपालकांनी याचा लाभ घ्यावा.

निरोगी जनावरांचे लसीकरण, गोठ्यातील स्वच्छता व पाण्याची डबकी असल्यास किटकनाशकांची फवारणी, गोचीड प्रतिबंधक औषधांचा वापर करावा. अधिक माहितीकरिता पशुधन विकास अधिकारी डॉ धनंजय पोळ (संपर्क क्रमांक ९४२३०२००५३) आणि पशुधन पर्यवेक्षक राहुल हगारे (संपर्क क्रमांक ९७६७१५१७१८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×