टोळीवर गंभीर स्वरूपाचे ८ गुन्हे दाखल
marathinews24.com
पुणे – जिल्ह्यातील खेड तालुक्यात दहशत निर्माण करून हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या कुख्यात गुंड मयुर तानाजी हजारे आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या आदेशानुसार केली आहे.
गॅंगवारमुळे मुलाचा गेला जीव, जेलमधून बाहेर येताच बापाने केले अंत्यसंस्कार – सविस्तर बातमी
राहुल ऊर्फ बंटी साहेबराव डफळ (वय 35, रा. धामारी, ता. शिरूर) गणेश दिलीप गोरडे (वय 23, रा. पुर, ता. खेड) मंगेश विलास दौंडकर (वय 35, रा. कनेरसर, ता. खेड) स्वप्नील रोहिदास गावडे (वय 30, रा. पुर, ता. खेड) रोहित रविंद्र दौंडकर (वय 25, रा. कनेरसर, ता. खेड) गणेश दत्तात्रय गावडे (वय 23, रा. पुर, ता. खेड) शुभम शिवाजी हजारे (वय 21, रा. कनेरसर, ता. खेड) गौरव राम हजारे (वय 20, रा. कनेरसर, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.
जिह्यातील गोसासी (ता. खेड) येथील हॉटेल दुर्वांकुरमध्ये १० मे आरोपींनी जेवणानंतर बिल मागितल्यामुळे हॉटेल मालकाला धमकी दिली. दुसऱ्या दिवशी रात्री साडे बाराच्या सुमारास आरोपींनी हॉटेल मालकाच्या भावाकडे “हप्ता सुरू कर, नाहीतर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत खंडणीची मागणी केली. फिर्यादीने नकार दिल्यावर मुख्य आरोपी मयुर हजारे याने पिस्तुलातून दोन गोळ्या झाडून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात विविध कलमांसह आर्म्स अक्टनुसार गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात १० आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यापैकी आठ जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी मयुर तानाजी हजारे व अक्षय बबन हजारे हे अद्याप फरार आहेत.
टोळीवर खेड आणि शिक्रापूर पोलिस ठाण्यांत खून, खंडणी, मारहाण, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि अग्नीशस्त्राचा वापर यांसह तब्बल आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळीची दहशत संपवण्यासाठी आणि परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोक्का कारवाई केली. दोन आठवड्यांत वालचंदनगर, वडगाव मावळ आणि खेड पोलिस ठाण्यांतून कुख्यात टोळ्यांवर मोक्का कारवाईची ही तिसरी घटना आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,सहायक पोलीस निरीक्षक सिसोदे, विक्रमसिंह तापकीर, मंगेश थिगळे, जनार्दन शेळके, तुषार पंदारे, संजु जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर पोलीस उपनिरीक्षक शंकर भवारी, पोलीस अंमलदार संदीप लांडे यांनी केली.























