Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

गॅंगवारमुळे मुलाचा गेला जीव, जेलमधून बाहेर येताच बापाने केले अंत्यसंस्कार

गॅंगवारमुळे मुलाचा गेला जीव, जेलमधून बाहेर येताच बापाने केले अंत्यसंस्कार

आयुश कोमकर याच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

marathinews24.com

पुणे – गँगवारामुळे मुलाचा जीव गेल्याचे दुःख बापाच्या चेहऱ्यावर जाणवत होते. चार दिवसांनी जेलमधून बाहेर आल्यावर बापाने मुलाला शेवटचे डोळे भरून पाहून घेतले. त्याला पाणी पाजून अंत्यसंस्कार करीत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अखेर आयुष उर्फ गोविंद कोमकर (वय १९ रा. नाना पेठ पुणे) याच्यावर सोमवारी (दि. ८) रात्री सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता.

दोघांनी झाडल्या १२ गोळ्या, ९ गोळ्यानी घेतला आयुषच्या शरिराचा वेध – सविस्तर बातमी 

खून झालेला आयुष कोमकर याच्यावर सोमवारी (दि. ८) रात्री सातच्या सुमारास कुटूंबियांनी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. यावेळी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने कडकोट बंदोबस्त तैनात केला होता. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खूनातील आरोपी गणेश कोमकर याचा तो मुलगा होता. कौटुंबिक वादातून टोळीने १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा गोळ्या झाडून खून केला होता. त्यावेळी टोळीने खून का बदला खून अशी शपथ घेतली होती. तेव्हापासून आंदेकर टोळीकडून आरोपींवर पाळत ठेवल्याचे पोलीस कारवाईतून दिसून आले होते.

भारती विद्यापीठ आणि गुन्हे शाखेने काही दिवसांपुर्वी आरोपी कृष्ण काळे याला अटक केली होती. चौकशीत त्याने आरोपी सोमनाथ गायकवाड याच्यासह इतर आरोपींच्या घराची रेकी करीत असल्याची कबुली दिली. त्यानंतर मात्र, ऐन गणेशोत्सवाची धामधुम सुरू असतानाच दोघा आरोपींनी रेकी करून आंदेकर खूनातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुश कोमकर याला ५ सप्टेंबरला इमारतीच्या पार्किंगमध्ये गाठले. त्याच्यावर १२ गोळ्या झाडून खून करीत बदला पुर्ण केला.

आंदेकर खूनातील आरोपी गणेश कोमकर येरवडा कारागृहात असून, मुलगा आयुशचा खून झाल्यानंतर त्याने न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने गणेशला मुलाच्या अंत्यसंस्कारला हजर राहण्यासाठी परवानगी दिली. त्यानुसार सोमवारी दि.८ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास त्याला कारागृहाबाहेर काढण्यात आले. पोलीस व्हॅनमधून बेड्या घालून त्याला आणले होते. वैकुंठ स्मशानभूमीत त्याला आणल्यानंतर आयुश कोमवर याच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी मोठ्या संख्येत पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×