Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

ढोल-ताशांच्या गजरात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतींचा विसर्जन सोहळा दिमाखात

ढोल-ताशांच्या गजरात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतींचा विसर्जन सोहळा दिमाखात

भव्य मिरवणुकीत पुष्पवृष्टी, भंडाऱ्याची उधळण व भक्तांचा उत्स्फूर्त जयघोष; पहाटे पांचाळेश्वर घाटावर बाप्पाचे विसर्जन

marathinews24.com

पुणे – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ज्या गणपतीला ओळखले अशा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तीभावाने निरोप देण्यात आला. रत्नजडित रथावर केलेली आकर्षक पुष्पसजावट, विद्युत रोषणाई, भंडाऱ्याची उधळण, ठिकठिकाणी झालेली पुष्पवृष्टी आणि ढोल-ताशांच्या गजरात तसेच “मोरया मोरया”च्या जयघोषात ही विसर्जन मिरवणूक पार पडली. विसर्जन मार्गावर बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी उसळली होती.

ॲड.भास्करराव आव्हाडांप्रमाणे ज्ञानाधारित प्रकाशवाटेची गरज-भारत सासणे – सविस्तर बातमी 

शनिवारी सकाळी साडेसात वाजता पोलीस उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या हस्ते बाप्पाची पूजा व आरती झाल्यानंतर सकाळी आठ वाजता रत्नमहालातून बाप्पा विराजमान होऊन मंडईतील टिळक पुतळ्याकडे निघाले. परंपरेनुसार टिळक पुतळा येथे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टतर्फे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते मानाच्या पाच गणपतींना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास बाप्पाच्या प्रत्यक्ष मिरवणुकीची सुरुवात झाली. ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी श्री गणेश रत्न रथाचे सारथ्य केले. रात्री अकराच्या सुमारास रथ बेलबाग चौकात दाखल झाला. मिरवणुकीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा व नगारा मिरवणुकीत पुढे होते . त्यामागोमाग श्रीराम आणि रमणबाग ढोल पथकांच्या वादनाने वातावरण दणाणून गेले. मार्गावर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून भंडाऱ्याची उधळण व पुष्पवृष्टी होत होती तर रथावरून विद्युत रोषणाई व गोल्ड फायरमुळे संपूर्ण मिरवणूक डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरत होती.

ढोल-ताशांच्या गजरात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतींचा विसर्जन सोहळा दिमाखात

पहाटे सव्वातीनच्या सुमारास टिळक चौकात रथ पोहोचल्यावर सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि उपायुक्त ऋषिकेश रावळे यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. त्यानंतर पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी पांचाळेश्वर विसर्जन घाटावरील महापालिकेच्या हौदात श्री गणेश रत्न रथाचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक 134 वर्षांपासून पारंपरिक रथातच होत होती, मात्र मागील वर्षापासून दरवर्षी नवा आकर्षक रथ तयार करण्याची परंपरा सुरू झाली आहे. यावर्षी रत्नजडित रथावर पिंक वेलवेट फुलांनी सजावट करण्यात आली होती. विद्युत रोषणाईसह रथावरील गणेशमूर्तीने सर्वांचे लक्ष वेधले. हजारो भाविकांनी या रथाचे फोटो व व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेतले.

यंदाची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणेच उत्साहात व जल्लोषात पार पडली. पोलिस प्रशासनाने लक्ष्मी रस्त्यावर प्रवेश दिल्यानंतर मिरवणुकीत सहभागी होता आले. निश्चित वेळेत मिरवणूक पूर्ण करण्याचे वचन पाळले गेले, त्यामुळे भाविकांना प्रतीक्षा करावी लागली नाही. संपूर्ण गणेशोत्सव निर्विघ्न व शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन, महापालिका, मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभल्याबद्दल विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी मनःपूर्वक आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×