लोहगावात ७ वर्षाच्या चिमुरडीसोबत ज्येष्ठाकडून अश्लील कृत्य

लोहगावात ७ वर्षाच्या चिमुरडीसोबत ज्येष्ठाकडून अश्लील कृत्य

विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील लोहगाव भागातील भागात राहणाऱ्या ७ वर्षांच्या चिमुकलीला घरी बोलवून नराधम ज्येष्ठाने तिच्याशी अश्लील कृत्य करत असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठाच्या कुटूंबातील चिमुकलीनेच हा प्रकार समोर आणला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

कुख्यात गुंड सुर्यकांत आंदेकरसह तिघांवर गुन्हा नोंद – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व आरोपीचे कुटूंबिय एकाच भागात राहण्यास आहेत. तक्रारदारांची सात वर्षांची मुलगी आहे. ती, आरोपीच्या घरी खेळण्यास जात असत. तिथेही एक लहान मुलगी आहे. त्यामुळे ती जात असत. दरम्यान, आरोपी चिमुकली घरी आल्यानंतर मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ पाहत असत. तसेच, ते पाहून तिच्याशी अश्लील चाळे करत होता. हा प्रकार मुलीने पाहिला होता.

गेल्या आठवड्यात आरोपीच्या घरातील मुलगी पिडीत कुटूंबियांकडे गेली. तिने संबंधित प्रकार त्यांना सांगितला. तसेच, तिला आमच्या घरी पाठवत जाऊ नका असे सांगितले. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने तिच्याकडे विचारपूस केली. तेव्हा ती खूप घाबरलेली असल्याचे दिसून आले. नंतर तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने सर्व घटना सांगितली. त्यानंतर कुटूंबाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास विमानतळ पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×