Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

शिरूर तालुक्यातील पात्र मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन

शिवाजीनगर मतदार संघातील पात्र मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन

पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ अंतर्गत पदवीधर तसेच शिक्षक मतदार नोंदणी करण्यास सुरुवात झाली असून शिरूर तालुक्यातील पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

‘पर्पल फेस्ट गोवा एक्सपेडिशन’ मोहिमेचा शुभारंभ – सविस्तर बातमी 

शिक्षक मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता शिक्षक मतदारांसाठी फॉर्म क्र. १९ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मतदार हा १ नोव्हेंबर २०२५ च्या लगत पूर्वीच्या सहा वर्षांतील किमान तीन वर्ष माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या अशा राज्यातील कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत अध्यापन केलेल्या प्रत्येक शिक्षक मतदार यादीत नाव नोंदविण्यास पात्र आहे.

पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता फॉर्म क्र. १८ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. भारतीय नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती, संबंधित मतदारसंघात सामान्यतः रहिवासी असलेली आणि १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान तीन वर्ष भारतातील पात्र विद्यापीठाची पदवी अथवा समकक्ष अर्हता प्राप्त केलेली प्रत्येक व्यक्ती पदवीधर मतदार म्हणून नोंदणीस पात्र आहे. अर्जदाराने अर्जामध्ये खोटी माहिती दिल्यास, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अन्वये संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अर्जदारांनी आवश्यक सर्व कागदपत्रांसह मुदतीत अर्ज सादर करावेत. असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, संगीता राजापूरकर, आणि पदनिर्देशित अधिकारी (शिक्षक व पदवीधर मतदारसंघ) तथा तहसिलदार, बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×