Breking News
घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक; ८ गुन्हे उघडकीसकुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्नबालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजननिवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्नजिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्ननगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका शांतेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीनगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीएटीएस’कडून कोंढवा भागातील संशयितांची झाडाझडतीवारजे, खडकीत अपघातात दोघे ठारनाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांचा ‌‘रंगयात्री‌’ ॲपला विरोध

इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना अर्थसहाय्यकरिता अर्ज करण्याचे आवाहन

इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना अर्थसहाय्यकरिता अर्ज करण्याचे आवाहन

ऑनलाईनपध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित आणि विकास महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींनी स्वयंरोजगाराकरीता विविध योजनांअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे; याकरिता www.msobcfdc.org/msobefde.in या संकेतस्थळावर ऑनलाईनपध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कृषी पदवीधरांनी शास्त्रीय पद्धतीने शेती करून समाजामध्ये स्वतःचे उदाहरण निर्माण करावे- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – सविस्तर बातमी 

महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरीता २० टक्के बीज भांडवल कर्ज योजना, १ लक्ष थेट कर्ज योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे.

अर्जदाराचे वय १८-५० वर्ष असल्याबाबतचा वयासंबंधित कागदपत्रे (शाळा/कॉलेज सोडल्याचा दाखला/जन्माचा दाखला), ३. जातीचा दाखला, आठ लाखाच्या मर्यादेत सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेला उत्पन्नाचा दाखला. स्थानिक रहिवासी असल्याचा दाखला (तहसीलदरांनी दिलेले रहिवाशी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र.) कुटुंबाचे शिधापत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, आधारसंलग्न बँकचे पासबुक, विवाहीत स्त्री अर्जदारासाठी नावात बदलाबाबतचे प्रतिज्ञापत्र किंवा लग्नपत्रिका किंवा राजपत्र आणि अर्जदाराचा छायाचित्रांची आवश्यकता आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्रमांक-बी, सर्वे क्रमांक, १०४/१०५, मनोरुग्णालय कॉर्नर, पोलीस चौकी समोर, विश्रांतवाडी, येरवडा. दुरध्वनी क्रमांक ०२०-२९५२३०५९, ई-मेल dmobcpune@gmail.com यावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×