Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

सॅलिसबरी पार्कात मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न

सॅलिसबरी पार्कात मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न

स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाच्या हातातील मोबाइल दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना २२ फेबु्रवारीला सॅलिसबरी पार्क परिसरात घडली आहे. याप्रकरणी तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरोड्याच्या तयारीतील सराईत टोळीला अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कोंढवा भागात राहायला आहे. रविवारी ( दि.२२ ) सायंकाळी सहाच्या सुमारास तरुण सॅलिसबरी पार्क भागात थांबला होता. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्याने तरुणाच्या हातातील मोबाइल संच हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. तरुणाने विरोध केल्यानंतर दुचाकीस्वार चोरटा भरधाव वेगात पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक सुजाता जाधव तपास करत आहेत.

ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख ८० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना रविवारी रात्री एरंडवणे भागात घडली. याबाबत ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ७० वर्षीय महिला पौड रस्ता भागात राहायला आहेत. रविवारी (२२ फेब्रुुवारी) रात्री सव्वानऊच्या सुमारास एरंडवणे भागातील रत्नदीप सोसायटी परिसरातून पतीसह जात होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×