सोशल मीडियावर धमकीचे स्टेट्स अपलोड करणे भोवले

सोशल मीडियावर धमकीचे स्टेट्स अपलोड करणे भोवले

आंदेकर टोळी समर्थकांवर अटकेची कारवाई; पाच जण गजाआड

marathinews24.com

पुणे – सोशल मीडियावर धमकीचे स्टेट्स अपलोड करणे पाच जणांना भोवले आहे. संबंधितांनी आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ इंस्टाग्राम अकाउंटवर धमकीचे स्टेटस अपलोड केले होते. याप्रकरणी पाच जणांवर समर्थ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. मंथन सचिन भालेराव, फैजान शेख, पियुष बिडकर, अथर्व नलावडे, ओंकार मेरगु अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

घरफोडीचा गुन्हा उघडकीस, टोळक्याला अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींनी बदला तो फिक्स, रिप्लाय होगा, आता फक्त बॉडी मोजा कुत्र्यांनो अशा आशयाचे स्टेटस आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवले होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेट्स दिसून आले. कुख्यात गुंड आंदेकर टोळीच्या समर्थनात आरोपींनी इन्स्टाग्रामवर स्टेटस अपलोड केले होते. त्यानंतर समर्थ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींची नावे निष्पन्न केली. त्यानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

समर्थ पोलिसांनी पाच जणांना अटक करून त्यांना ठाण्यात हजर करण्यात आले. चौकशीत त्यांनी इन्स्टाग्रामवर आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ स्टेट्स अपलोड केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दिनांक ४ ऑक्टोबरला आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

पोलिसांनी आरोपींची काढली धिंड

कुख्यात गुंड बंडू आंदेकर टोळीची नाना पेठेसह ठिकठिकाणी दहशत आहे. त्यांची दहशत कमी करण्यासाठी समर्थ पोलिसांनी टोळीच्या साथीदारांची नाना पेठेसह समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धिंड काढण्यात आली. आंदेकर टोळीविरुद्ध कोणाची काही तक्रार असल्यास थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, आम्ही सर्व आरोपींविरुद्ध कारवाई करू, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×