खान्देशी मराठा समाजाचा वधू-वर परिचय मेळावा ९ नोव्हेंबर रोजी
marathinews24.com
पिंपरी – खान्देश मराठा मंडळाच्या वतीने येत्या रविवारी खान्देशी मराठा विवाह इच्छुक वधू-वर, तसेच पालकांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (दि. ९ नाव्हेंबर) सकाळी ९.३० वाजता सेक्टर २४, प्राधिकरण निगडी मधील खान्देश मराठा मंडळाच्या सभागृहात वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे.
वर्षातून ३ ते ४ वेळा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक मेळाव्यात १० ते १५ रेशीमगाठी जुळून येतात. या कार्यक्रमासाठी पुणे परिसर तसेच खान्देशातील पालक आपल्या उपवर मुला-मुलींना घेऊन सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात.
पायाभूत विकासाची उपलब्धी नागपूरच्या विकासाची असेल त्रिसूत्री – सविस्तर बातमी
यावेळी वधू-वर मेळाव्याचे उद्घाटन व सूची प्रकाशन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या कृषी व्यापार वृद्धी विभागाचे प्रमुख डॉ. भास्कर पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती वधू-वर परिचय मेळाव्याच्या संयोजन समितीचे कार्याध्यक्ष जितेंद्र नारायण पाटील, विवाह समिती उपप्रमुख बाळासाहेब पाटील व मधुकर पगार यांनी दिली. अधिक माहितीसाठी ९४०५१२९६०० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



















