Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

Crime News : सामायिक मीटरवरील चार्जिंगचा वाद; तरुणाच्या हाताला केले फ्रॅक्चर

Pune Bus Theft : बस प्रवासात ज्येष्ठ महिलेची ७० हजारांची बांगडी चोरी

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात घटना

marathinews24.com

पुणे – सोसायटीच्या सामायिक मीटरवर इलेक्ट्रिक दुचाकी चार्ज करण्यास विरोध केल्याचा जाब विचारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. याच कारणावरून झालेल्या वादात तिघांनी त्याला मारहाण केली. यावेळी धक्का देऊन खाली पाडल्याने त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी प्रथमेश खेतले (रा. खोपडे हाईट्स, खोपडेनगर, कात्रज) आणि त्याच्या दोन मित्रांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम राजेंद्र कोंढाळकर (वय २६, रा. खोपडे हाईट्स) यांनी फिर्याद दिली आहे.

गुंतवणुकीच्या नावाखाली कुटुंबाची १७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गोकुळनगरमधील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या पुढे ही घटना घडली. कोंढाळकर आणि खेतले हे एकाच इमारतीत राहतात. सोसायटीच्या सामायिक मीटरवर स्वतःची इलेक्ट्रिक दुचाकी चार्ज करू नये, असे कोंढाळकर यांनी खेतलेला सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. शिवीगाळ केल्यानंतर खेतलेने फोन करून दोन मित्रांना बोलावून घेतले. त्यानंतर तिघांनी कोंढाळकर यांना मारहाण केली. यावेळी एका मित्राने त्यांना धक्का देऊन खाली पाडले. या प्रकारात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. सोसायटीतील सामायिक वीजवापराचा प्रश्न बोलून सोडवण्याऐवजी वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचला. पुढील तपास पोलिस अमंलदार नवनाथ खताळ करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×