Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

Investment Fraud in Pune : गुंतवणुकीच्या नावाखाली कुटुंबाची १७ लाखांची फसवणूक

विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – आर्थिक कंपनीमध्ये पैसे गुंतविण्यास प्रवृत्त करून एका ज्येष्ठ व्यावसायिकासह त्यांच्या कुटुंबाची १७ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुंतविलेली रक्कम आणि परतावा मागितल्यानंतर सुरुवातीला वेळ मागणाऱ्या आरोपींनी पुढे पैसे देण्यास नकार दिल्याने हा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मिलिंद कल्याण कुलकर्णी (रा. तेजल अपार्टमेंट, गोकुळ रोड, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे; वय ५८) आणि सिद्धार्थ मिलिंद कुलकर्णी (वय ३१ रा. तेजल अपार्टमेंट, गोकुळ रोड, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे) यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अर्जुनकुमार कृष्णपद घोष (वय ६८ रा. नारायण पेठ, लोखंडी तालीम लेन, कुंटे चौक, लक्ष्मी रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिका – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ जानेवारी २०२४ ते दि. २८ नोव्हेंबर २०२४ या काळात गुंतवणुकीचे व्यवहार झाले. सिद्धार्थने घोष यांच्या मोठ्या मुलीला आर्थिक कंपनीमध्ये पैसे गुंतविण्याचा वारंवार आग्रह केला. त्यानंतर मुलीने अडीच लाख रुपये, तर तिच्या पतीने दोन लाख १० हजार रुपये ऑनलाईन हस्तांतरित केले. घोष, त्यांच्या मुली आणि जावयाने मिळून आरोपीने सांगितलेल्या आरबीएल बँकेच्या खात्यात एकूण १७ लाख ३० हजार रुपये भरले. मिलिंद हा इन्फिनिट बीकन कंपनीमध्ये मास्टर फ्रँचायझी आणि सिद्धार्थ बिझनेस पार्टनर असल्याच्या विश्वासातून ही गुंतवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. व्यवहारांच्या नेमक्या वेळा उपलब्ध नाहीत. मार्च, एप्रिल आणि मे २०२६ मध्ये कुटुंबाने आरोपींकडे पैशांची विचारणा केली. सुरुवातीला सर्व पैसे परत करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, पुढे कोणतेही पैसे देणे लागत नसल्याचे सांगून रक्कम परत करण्यास नकार दिल्याची फिर्याद आहे. सहायक पोलिस निरीक्षक क्षीरसागर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×