Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

Dive Ghat accident : दिवे घाटात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यू

सहप्रवासी मुलगा जखमी

marathinews24.com

पुणे – Dive Ghat accident : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारासह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दिवे घाटात घडली. अपघातात दुचाकीवरील मुलगा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली. सुंदर गंगावणे, अनन्या गंगावणे अशी मृत्युुमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात सोहम गंगावणे जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ट्रक चालक हनुमंत बाबूराव मलकापुरे (वय ३२, रा. नागेवाडी, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर) याला अटक करण्यात आली. याबाबत अश्विनी उत्तम पवार (वय ३०, रा. कमलविहार सोसायटी, धनकवडी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात रविवार पेठेत महिलेच्या पिशवीतून रोकड चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अश्विनी पवार यांचे मामेभाऊ सुंदर गंगावणे, अनन्या, सोहम हे दुचाकीवरुन पुणे-सासवड रस्त्यावरुन ३० मार्च रोजी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास निघाले होते. दिवे घाटात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात सुंदर गंगावणे, अनन्या आणि सोहम गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक ढावरे, उपनिरीक्षक देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेले सुंदर, अनन्या, सोहम यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोहम याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×